ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - मुंबई विमानतळावर 29 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. मुंबई विमानतळावर कस्टमच्या अधिका-यांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला अटकदेखील करण्यात आली आहे. रियाधहून मुंबईकडे येणा-या एका प्रवाशाकडे 1160 ग्रॅम वजनाची 10 सोन्याची बिस्किटे आढळून आली.
मोहम्मद अल्ताफ मोईदिन असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सौदी अरेबियातील रियाधहून आलेले जेट एअरवेजचे विमान मुंबई विमानतळावर उतरले होते. त्यानंतर हे विमान मंगळुरूला जाणार होते. यापूर्वी कस्टमच्या अधिका-यांनी केलेल्या तपासणीत मोहम्मद अल्ताफ मोईदिनकडे 29 लाख रुपयांची आढळून आलेली सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली.
AIU intercepted a passenger at Mumbai Airport,who was travelling from Riyadh & recovered 10 gold bars weighing 1160gms valued at Rs 29 lakhs pic.twitter.com/XRPY0Fn1xe— ANI (@ANI_news) 11 January 2017
आणखी बातम्या
(पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्यावर बूटहल्ला)
(पेट्रोल पंप पुन्हा जाणार कॅशलेसकडून कॅशकडे..!)