लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्तचर विभागाच्या पथकाने चार तरुणांना अटक करून त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे आयात करण्यात आलेले सुमारे पावणेदोन किलो वजनाचे २९ लाखांचे सोने जप्त केले. मोहम्मद रेहान, मोहम्मद इश्तियाक, मोहम्मद इस्सार व फारूख इस्लाम अशी त्यांची नावे असून सर्व जण उत्तर प्रदेशातील रामपूर येथील टंडा येथील आहेत. त्यांनी नेहरू शर्ट, पायजम्याची नाडी आणि फाउंटन पेनमध्ये लपवून सोन्याच्या पट्ट्या, तुकडे येथे आणले होते.जेद्दादहून मस्कत मार्गे ओमान एअरवेजच्या २०३ फ्लाइटने शुक्रवारी रात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेले चार प्रवासी सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती एअरलाइन्स गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार चौघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेले सोन्याचे तुकडे व पट्ट्या जप्त करण्यात आल्या.इश्तियाकने त्याच्या पायजम्याच्या नाडीच्या ठिकाणी सोन्याचे तुकडे लपविले होते. रेहानने तोंडात, फाउंटेन पेनमध्ये सोने ठेवले होते. तर इस्सार व फारुख यांनी पायजम्याची स्ट्रिंग आणि त्याच्या कुर्त्याचे खिसे आणि बेल्टमध्ये सोने लपवले होते.
विमानतळावरून २९ लाखांचे सोने जप्त
By admin | Published: June 19, 2017 2:37 AM