शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

महाराष्ट्रात अवघ्या पाच वर्षांत घटली ३.२५ लाख हे. शेतजमीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 06:21 IST

पेरणीच्या क्षेत्रातही ३.२४ लाख हेक्टरने झाली घसरण : जितकी एकूण शेतीयोग्य जमीन देशभरात कमी झाली, त्याच्या निम्म्याहून अधिक जमीन महाराष्ट्राने गमावली

चंद्रशेखर बर्वे - 

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरले असतानाच राज्यात शेतीचे क्षेत्रफळ झपाट्याने कमी होत असल्याची चिंताजनक माहिती आहे. अख्ख्या भारतात शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्रफळ ६ लाख ४२ हजार हेक्टरने कमी झाले आहे. यात महाराष्ट्रातील ३ लाख २५ हजार हेक्टर शेतीचा समावेश आहे. अर्थात पन्नास टक्क्यांहून अधिक कृषी क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात कमी झाले.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ब्रिजेंद्रसिंग ओला यांना लोकसभेत दिलेल्या एका लेखी प्रश्नाच्या उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे. या माहितीनुसार, देशात शेतजमीन व पेरणीचे क्षेत्रफळ या दोन्ही गोष्टींचा आकार झपाट्याने घटत चालला आहे. सरकारने पाच वर्षांच्या कालावधीतील शेतजमिनीच्या उपयोगाबाबतचा अद्ययावत अहवाल जारी केला. यातील आकडेवारीनुसार, २०१८-१९ मध्ये भारतात १८ कोटी ६ लाख २४ हजार हेक्टर जमीन शेतीयोग्य होती. मात्र, २०२२-२३ मध्ये शेतजमिनीचे क्षेत्रफळ कमी होऊन १७ कोटी ९९ लाख ८२ हजार हेक्टरपर्यंत खाली आले.  या पाच वर्षांत देशातील ६ लाख ४२ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्रफळ घटले.

ही आहेत कारणे...राष्ट्रीय महामार्ग, राज्याचे रस्ते आणि रेल्वे लाईन यासारख्या पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासोबतच शहरीकरण आणि औद्योगिकीकरणासाठी कृषी जमिनीचा वापर होणे, देशातील शेतीचे क्षेत्र घटण्यामागचे प्रमुख कारण होय.२०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत देश पातळीवर शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्रफळ कमी झाले असले तरी मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरयाणा, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेशासह १० राज्यांत हे प्रमाण वाढले आहे.

१.६४ कोटी हेक्टर जमिनीवर राज्यात यंदा लागवड झाली.५२ लाख हेक्टरवर कापूस५० लाख हेक्टरवर सोयाबीन३.७ कोटी हेक्टर राज्याचे एकूण क्षेत्रफळ१.६५ कोटी हेक्टर जमीन शेती लागवडीखाली

अशी घटली शेतजमीन२०१८-१९ पासूनच्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील शेतीयोग्य जमीन घटली आहे आणि पेरणीचे क्षेत्रफळही कमी झाले आहे. २०१८-१९ मध्ये राज्यात २ कोटी ७ लाख १९ हजार हेक्टर जमीन शेतीयोग्य होती. २०२२-२३ मध्ये ही संख्या २ कोटी ३ लाख ९४ हजार हेक्टरपर्यंत खाली आली. अर्थात, पाच वर्षांत महाराष्ट्रात ३ लाख २५ हजार हेक्टर शेतीयोग्य जमीन कमी झाली.

असे घटले पेरणी क्षेत्रपेरणीच्या क्षेत्रफळाबाबतही तेच घडले आहे. २०१८-१९ मध्ये १ कोटी ६८ लाख १५ हजार हेक्टरमध्ये लागवड झाली होती. तर, २०२२-२३ मध्ये पेरणीचे क्षेत्र घटून १ कोटी ६४ लाख ९१ हजार हेक्टरवर आले. थोडक्यात, पाच वर्षांत राज्यातील पेरणीचे क्षेत्र ३ लाख २४ हजार हेक्टरने कमी झाले.

वनक्षेत्र    ९%बिगर शेती    १२%लागवडीखाली नसलेली    ८%पडीक जमीन    ९%

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी