पंढरपूर (जि. सोलापूर) : आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी राज्य परिवहन महामंळामार्फत ३ हजार ७८१ जादा बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासाठी १० टक्के बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने आयोजित नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. रावते म्हणाले, २१ ते २८ जुलै या कालावधीत महामंडळाचे सुमारे ८ हजार कर्मचारी सेवा देणार आहेत़ प्रवाशांच्या सोयीसाठी तीन तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती करण्यात येत आहे. या बसस्थाकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे, उपहारगृहे, रुग्णवाहिका, विभागनिहाय चौकशी कक्ष तसेच संगणकीय उद्घोषणा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत़ आषाढी यात्रेच्या दिवशी चंद्रभागा बसस्थानकावरुन गर्दीच्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी पोलीस विभागाने एस. टी बसेससाठी राखीव वेळ ठेवावी. जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही. त्यामुळे भाविकांना इच्छितस्थळी पोहोचता येईल.बाजीराव विहीर येथे २१ जुलै रोजी होणाºया रिंगण सोहळ्याला जाण्यासाठी व येण्यासाठी चंद्रभागा बसस्थानक येथून १०० जादा बसची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात्रेनंतर परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परतीच्या प्रवासासाठी १० टक्के बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येतील.यासाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन आॅनलाईन आरक्षण करावे. तसेच पंढरपूर येथील मठ, यात्री निवास, धर्मशाळा आदी ठिकाणी वारकरी व भाविक मुक्कामासाठी थांबले आहेत, अशा ठिकाणी महामंडळाचे कर्मचारी जाऊन प्रवाशांच्या मागणीनुसार आगाऊ आरक्षण करुन देतील. या सुविधांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रावते यांनी केले.बसस्थानकाची पाहणीपरिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या उभारण्यात येणाºया भिमा बसस्थानक, चंद्रभागा बसस्थानक, तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथील बसस्थानकांची पाहणी केली. संबंधित अधिकाºयांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.
आषाढीसाठी ३ हजार ७८१ जादा एसटी बस, दिवाकर रावते यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:56 AM