शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मनरेगासाठी 3 हजार कोटी रूपयांचा भरीव निधी- रोहयो मंत्री जयकुमार रावल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 9:06 PM

स्वातंत्र्य दिनी गावांमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पुढील काळात करावयाच्या कामांचा आराखडा तयार केला जातो. 

मुंबई, दि. 13 : स्वातंत्र्य दिनी गावांमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पुढील काळात करावयाच्या कामांचा आराखडा तयार केला जातो. महाराष्ट्रात मनरेगा योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून 2017-18 या वर्षासाठी 3 हजार कोटी रूपयांचा भरीव निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे आपल्या गावात अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने यंदाच्या ग्रामसभांमध्ये मनरेगांतर्गत जास्तीत जास्त कामे मंजूर करुन घेण्यात यावीत, असे आवाहन रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये पुढील काळातील कामांना मंजूरी प्राप्त करून घेणे आवश्यक असते. केंद्र शासनाने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राकरीता 800 लक्ष मनुष्य दिवस इतके लेबर बजेट मंजूर केले आहे. केंद्राकडून 2 हजार 840 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. योजनेअंतर्गत सद्यस्थितीत 4 लाख 95 हजार 470 इतकी कामे शेल्फवर असून 12.73 कोटी मनुष्य दिवस इतकी त्यांची मजूर क्षमता असल्याचे रावल यांनी सांगितले. रावल यांनी  केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेऊन रोजगार हमी योजनेसाठी महाराष्ट्राला भरीव  निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र शासनाकडून मजुरीकरीता 861 कोटी रूपये तर साहित्य पुरवठ्याकरीता 434 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 2016-17 मध्ये या योजनेतून साधारण दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यातून साधारण दिड लाख कामे पूण करण्यात आली. आता चालू वर्षी या योजनेसाठी ३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असे रावल यांनी सांगितले.लाखांवर सिंचन विहीरींची निर्मितीसमृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची प्रमुख 11 कामे 2017-18 या वर्षामध्ये प्राधान्याने घेण्यात येणार आहे. या अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना राबविण्यात येत असून त्यासाठी 1 लाख 11 हजार 111 विहीरींच्या बांधकामाचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 1 लाख 8 हजार 938 कामे पूर्ण व चालू अवस्थेत आहेत. एका सिंचन विहीरीतून सुमारे 2 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्यामुळे सिंचन विहीरीसाठी राबविण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून राज्यातील साधारण 2.25 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, अशी माहितीही रावल यांनी दिली. कल्पवृक्ष फळबाग योजनेअंतर्गत 1 लाख 11 हजार 111 कामांचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले असून 53 हजार 407 कामे चालू व पूर्ण अवस्थेत आहेत. 4 कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी मनरेगा योजनेतील अंकूर रोपवाटीकांमधून मोठ्या प्रमाणावर रोपांचे वाटप करण्यात आले आहे.48 हजार शेततळी पूर्णरोहयो विभागामार्फत मागेल त्याला शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत 1 लाख 11 हजार 111 शेततळ्यांचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 48 हजार 413 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून 7 हजार 877 शेततळ्यांची कामे सुरू आहेत. या योजनेकरीता यावर्षी १०० कोटी रुपयांचे अनुदान अर्थसंकल्पीत करण्यात आले आहे, अशी माहिती रावल यांनी दिली.