मुंबई : अलीकडे आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांसह ३० अधिकाऱ्यांची आज राज्य शासनाने बदली केली. व्ही. राधा या उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन आयुक्त असतील. त्या आतापर्यंत सिडकोच्या सहआयुक्त होत्या. सह विक्रीकर आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांना सिडको; मुंबईच्या सहआयुक्तपदी नेमण्यात आले आहे. कृषी स्पर्धात्मकता प्रकल्प; पुणेचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांना महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनमध्ये त्याच पदावर पाठविण्यात आले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे हे सामान्य प्रशासन विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. महसूल आणि वने विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे हे अल्पसंख्याक विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव जे.पी. गुप्ता हे अमरावतीचे नवे विभागीय आयुक्त असतील. राधिका रस्तोगी यांना उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी पाठविण्यात आले आहे. विकासचंद्र रस्तोगी हे महसूल आणि वन विभागात सचिव म्हणून येत आहेत. आर.डी. देवकर हे कर्मचारी राज्य कामगार योजनेचे नवे आयुक्त असतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सिंगल यांना उद्योग संचालनालयाच्या विकास आयुक्तपदी नेमण्यात आले आहे. अमरावती जिल्हा परिषदेचे आयुक्त एस.वाय. पाटील यांची बदली भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक; पुणे या पदावर तर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची बदली धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. धुळ्यात आतापर्यंत जिल्हाधिकारी असलेले ए. बी. मिसाळ हे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.के. जगदाळे हे आदिवासी विकास विभागाचे (नाशिक) नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही. निंबाळकर हे नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तर नियामक प्राधिकरणाचे सचिव एच.पी. तिम्मोड हे हिंगोली जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. श्वेता सिंघल या कामगार विभागाच्या नवीन उपसचिव, विभागीय जात पडताळणी समितीचे (सोलापूर) अध्यक्ष एस.एल. अहिरे हे भंडारा जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी तर विभागीय जात पडताळणी समिती; मुंबईचे अध्यक्ष के.बी. फंड हे शुल्क नियामक प्राधिकरण; मुंबईचे नवे सचिव असतील. राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक आर. विमला राजीव गांधी जीवनदायी मिशन; नवी मुंबईच्या नवीन आयुक्त असतील. विभागीय जात पडताळणी समिती; नवी मुंबईचे अध्यक्ष ए.ए. शिंगारे हे भिवंडी-निजामपूर महापालिकेचे नवे आयुक्त असतील. मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव राजेश नार्वेकर रायगड जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. विभागीय जात पडताळणी समिती; धुळेचे अध्यक्ष एम.जी. गुरसाल हे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जात आहेत. (विशेष प्रतिनिधी)एस.एल. यादव - सह महानगर आयुक्त; एमएमआरडीए मुंबई (उपमहागनर आयुक्त; एमएमआरडीए), के.एच. कुलकर्णी - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती (सहायक निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली), आर.बी. भागडे - व्यवस्थापकीय संचालक राज्य शेती महामंडळ; पुणे, योगेश म्हसे - आयुक्त; उल्हासनगर महापालिका (अतिरिक्त जिल्हाधिकारी; सिडको), ए.एन. कारंजकर - व्यवस्थापकीय संचालक कृषी उद्योग विकास महामंडळ (अध्यक्ष, विभागीय जात पडताळणी समिती; औरंगाबाद), व्ही.एल. भीमनवार - मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव (मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव). नरेंद्र गीते - महापालिका आयुक्त; मीरा-भार्इंदर महापालिका (ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे खासगी सचिव).
३० आयएएस अधिकाऱ्यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2016 4:24 AM