कोल्हापूर : पन्हाळ्यावरून कोल्हापूरकडे देवदर्शनासाठी जाणाऱ्या खासगी आरामबसला बांबरवाडी येथे रविवारी झालेल्या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले. हे सर्व प्रवासी मुंबईचे असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबईहून ३५ पर्यटक खासगी आरामबसमधून रविवारी सकाळी पन्हाळगड येथे पर्यटनासाठी आले होते. नंतर ते कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनसाठी तेथून निघाले. दुपारी कोल्हापूर रस्त्यावरील बांबरवाडी येथे बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे बस मोठ्या नागमोडी वळणावर खोल शेत जमिनीवर कोसळली. यात बसमधील ३० पर्यटक जखमी झाले. जखमींमध्ये महिला व बालकांची संख्या मोठी आहे. जखमींना तातडीने कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल केले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जादा डॉक्टरांची कुमक मागविण्यात आली. काही जखमींवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती गंभीर असलेल्या पर्यटकांना प्राथमिक उपचार करून राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ही आरामबस ही भांडुप येथील असल्याचे जखमींच्या नातेवाइकांनी सांगितले. (प्रतिनिधी)जखमींची नावे : मंथन महेश घाणेकर (वय ७), साक्षी घाणेकर (२६), वेदा सचिन जडियार (४), संदीप सचिन जडियार (१२), महेश बाबू घाणेकर (३२), रोहिणी रामचंद्र गांगरकर (२२), अनुजा सचिन जडियार (३५), सुनंदा लक्ष्मण पकडे (५५), दीक्षा राजेश घाणेकर (३५), किशोर जनार्दन धुरी (२५), ओम्कार रामचंद्र गांगरकर (१६), लक्ष्मण बाबू खोबडे (६५), प्रसाद नामदेव इंदुलकर (४६), योगेश शिगवण इंदुलकर (२८), जान्हवी शिगवण इंदुलकर (२६), प्रेम शिगवण इंदुलकर (४), रोशण प्रभाकर परब (२९, सर्व रा. भांडुप, मुंबई), प्रकाश कृष्णा दिवाळे (३२), लक्ष्मी धोंडू पडे (४५), प्राप्ती प्रकाश दिवाळे (२५), श्रावणी शरद कातकर (२८), शरद रामचंद्र कातकर (३८), सारा शरद कातकर (७), पार्थ शरद कातकर (४), सुशील सोनू जडियार (२८), संजय महादेव दिवाळे (३२), वैशाली तुकाराम उदेक (४८), तुकाराम सोनू उदेक (५०), तेजस तुकाराम गांगरकर (१६, सर्व रा. घाटकोपर, मुंबई)
पन्हाळ्याजवळ बस अपघातात मुंबईचे ३० जखमी
By admin | Published: February 22, 2016 2:15 AM