शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

३० हजार कोटींचे प्रकल्प थंडबस्त्यात!

By admin | Published: December 19, 2014 12:54 AM

राज्यात सिंचनाचे ३०,२४०.७१ कोटी रुपये खर्चाचे १४५ प्रकल्प सरकारच्या नव्या भूमिकेमुळे थंड्या बस्त्यात जाणार आहेत. त्याचवेळी ज्या प्रकल्पांवर ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त खर्च झाला आहे

९३ प्रकल्पांना एकाच वर्षात सगळा निधी मिळणार : ६७ हजार कोटींच्या ३५९ प्रकल्पांना वर्षभर निधी नाहीअतुल कुलकर्णी - नागपूर राज्यात सिंचनाचे ३०,२४०.७१ कोटी रुपये खर्चाचे १४५ प्रकल्प सरकारच्या नव्या भूमिकेमुळे थंड्या बस्त्यात जाणार आहेत. त्याचवेळी ज्या प्रकल्पांवर ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त खर्च झाला आहे असे प्रकल्प आधी पूर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जाहीर केल्यामुळे राज्यातल्या ९३ प्रकल्पांना वर्षभरात संपूर्ण निधी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.आता युती सरकारने ७५ टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पांना आधी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा राज्यातल्या जसा ९३ प्रकल्पांना होणार आहे तसाच त्याचा फटका ३५९ लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांना बसणार आहे. अशा प्रकल्पांना २०१५-१६ या आर्थिक वर्षात एक रुपया देखील मिळू शकणार नाही. प्रत्येकाला आपल्या भागातील प्रकल्पासाठी निधी हवा आहे. त्यासाठी सतत राजकीय दबाव टाकण्यात आल्यामुळे ‘सब घोडे बारा टके’ या न्यायाने आघाडी सरकारने सगळ्यांना निधी वाटप केला. परिणामी राज्यात एकही प्रकल्प पुर्णत्वास गेला नाही. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज होती ती देखील आघाडी सरकारला दाखवता आली नव्हती. मात्र युती सरकारने आजतरी ती भूमिका जाहीरपणे घेतली आहे. सगळे प्रकल्प पूर्ण होतील मात्र प्राधान्यक्रम ठरवूनच ते पूर्ण होतील असे जलसंपदा मंत्री महाजन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.असे असतानाही मागील सरकारने नवीन कामे घेण्याचा सपाटा लावला तेव्हा राज्यपालांनी हस्तक्षेप केला. कोणतीही नवीन कामे घेऊ नका, ६०० हेक्टर सिंचन होणारे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी त्यांना पैसे कोठून आणणार हे स्पष्ट करा, आणि आहे त्याच प्रकल्पांसाठी प्रचंड पैसे लागणार आहेत त्यामुळे प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवा असे स्पष्ट आदेशही राज्यपालांनी दिले होते. तरीही त्यावर अंमलबजावणी झाली नाही. युती सरकारने सत्तेवर येताच मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यामुळे निधी न मिळणारे प्रकल्प ज्या भागात आहेत त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी हा निर्णय कशा पध्दतीने स्वीकारतील हा महत्वाचा भाग आहे.