गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या गारपिटीचा मोठा फटका येथील पक्ष्यांना बसत आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान गारपिटीत 300 पोपटांचा दुर्देवी मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून येथील शिव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडांवर पोपटांची मोठी वस्ती होती. मात्र, कालच्या तुफान गारपिटीत या झाडावरील बहुतांश पोपट जखमी झाले आहेत. यापैकी 300 पोपटांचा दुर्देवी अंत झाला आहे.
वाशिम जिल्हय़ात पुन्हा गारपीट; पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान वाशिम: जिल्हय़ात १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला. गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा गारपिटीने वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा व मंगरुळपीर तालुक्याला झोडपले. १२ फेब्रुवारीला कारंजात गारपीट झाली होती. गहू, हरभरा यासह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी ‘गारद’ झाला आहे.जिल्हय़ात १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला. गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा गारपिटीने वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा व मंगरुळपीर तालुक्याला झोडपले. १२ फेब्रुवारीला कारंजात गारपीट झाली होती. गहू, हरभरा यासह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी ‘गारद’ झाला आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून, शेतकर्यांना पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला. रविवारी रिसोड व मालेगाव तालुक्याला गारपिटीने झोडपून काढल्यानंतर सोमवारी कारंजा तालुक्यात गारपीट झाली. मंगळवारी वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर तालुक्यात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गारपीट झाली तर रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास मानोरा तालुक्यातील रूई गोस्ता परिसरात गारपीेट झाली. वाशिम शहरातही सायंकाळी ५ वाजतानंतर अवकाळी पाऊस व गारपीट झाली. दरम्यान, रविवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हय़ातील ८,५00 हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले असून, सर्वेक्षणाचे काम सुरू असतानाच बुधवारी पुन्हा गारपीट झाली. त्यामुळे यापूर्वी सर्वेक्षण झालेल्या गावातही पुन्हा सर्वेक्षण करण्याची वेळ आली आहे. अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्यांची एकच धांदल उडाली. वादळी वार्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचेही वृत्त आहे.
वाशिम तालुक्यातही नुकसानवाशिम: बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वाशिम शहरासह तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने गहू, हरभरा यासह भाजीपाला व फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. देपूळ, अनसिंग, धानोरा मापारी परिसरात पिकांच्या नुकसानाची तीव्रता अधिक आहे. वाशिम तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे बुधवारपासून केले जातील, अशी माहिती तहसीलदार बलवंत अरखराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मंगरुळपीर तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊसशहरासह तालुक्यात १३ फेब्रुवारी रोजी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकर्यांची एकच धांदल उडाली होती.१३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्यांच्या गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले असून, काही प्रमाणात भाजीपाला व फळबागांनासुद्धा पावसाचा फटका बसला. आधीच नापिकी व कर्जबाजारीपणा तसेच शेतमालाला नसलेले भाव यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत असून, त्यातच या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्थिक मदत द्यावी अशी नुकसानग्रस्त शेतकर्यांची मागणी आहे.
गोवर्धन, किनखेडा, पेनबोरी, मसलापेन येथे गारपीटरिसोड: रविवारी सकाळी व रात्रीच्या सुमारास रिसोड तालुक्यातील २५ ते ३0 गावांना गारपिटीने झोडपून काढले होते. त्यानंतर आता पुन्हा १३ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील गोवर्धन, किनखेडा, पेनबोरी, मसलापेन, वाडी रायताळ, पळसखेड, मोहजा इंगोले, भोकरखेडा, देगाव, धोडप, वाडीरायताळ यासह १0 ते १५ गावांत गारपीट झाली. गोवर्धन येथे जवळपास १२ ते १५ मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे शेतकर्यांचा हातातील उभ्या पिकांचे होत्याचे नव्हते झाले, अशी माहिती गोवर्धन वाघ, युवा शेतकरी निखिल प्रभाकर वाघ यांनी दिली. किनखेडा येथील रेशीम उत्पादक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. पेनबोरी येथे एक गोठा उद्ध्वस्त झाला असून, पिकांचे प्रचंड नुकसान झाले. वाडी रायताळ, पळसखेडा परिसरात माजी पं.स. सभापती सुभाष खरात, तलाठी नरवाडे, ग्रामसेवक देशमाने यांनी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पाहणी केली असून, बुधवारी पंचनामे केले जातील, अशी माहिती तहसीलदार राजू सुरडकर यांनी दिली.