शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

मुंबईतील रस्त्यावरचे ३०० वर्ष वयाचे इतिहासपुरुष; अर्थात ब्रिटीशकालीन ‘माईलस्टोन्स..’

By admin | Published: March 11, 2016 11:31 AM

मुंबईत एकूण १३-१४ माईलस्टोन होते पण आज त्यातील केवळ ६-७ शिल्लक आहेत, बाकीचे काळाच्या (की रस्त्याच्या?) उदरात गडप झालेत...

मुंबई, दि. ११ - मुंबईत अजुनही तग धरून असलेल्या ब्रिटीशकालीन 'माईलस्टोन्स'ची माहिती माझ्या वाचनात आली आणि त्यांचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. मला माझ्या वाचनातून सापडलेल्या व मी पाहिलेल्या त्यापैकी काही माईलस्टोन्स बद्दल माहिती इथे देत आहे. 
मुंबईत असे एकूण तेरा-चौदा माईलस्टोन होते व आजमितीस त्यातील केवळ सहा-सातच शिल्लक असून बाकीचे काळाच्या (की रस्त्याच्या?) उदरात  गडप झाले आहेत अशी माहिती बऱ्याच ठिकाणी मिळते.. यापैकी काही 'माईलस्टोन'चा माग काढला व त्यांचं प्रत्यक्ष 'दर्शन' घेऊन आलो..त्या 'माईलस्टोन्स'चे फोटो व लोकेशन खास वाचकांसाठी... 
हे सर्व माईलस्टोन्स मुळात सहा-सात फुट उंच होते असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो व ते तसे असावेत असा अंदाज आपण सहज बंधू शकतो कारण रस्त्यांवर मोटारी अवतरण्या पूर्वी सर्व प्रवास बैल वा घोडागाडीतून होत होता व बैलगाडी किंवा घोडागाडीची उंची जास्त असल्यामुळे त्यात बसलेल्या सवारीला किती अंतर झाले किंवा राहिले हे सहज दिसण्यासाठी तेवढी उंची गरजेचीच होती. हे माईलस्टोन्स आयताकृती उभट चौकोनी दगडाचे असून त्यावर रोमन अक्षरं कोरलेली आहेत व टॉप पिरॅमिड च्या आकाराचा आहे हे सोबतच्या फोटोंवरून दिसेल. 
या माईलस्टोन्सवरील सर्व  अंतरं  'सेंट थॉमस चर्च'पासून  मोजली  गेली आहेत.. 'सेंट थॉमस चर्च'  म्हणजे  आताच्या  फोर्ट  मधील  हॉर्निमन  सर्कलच्या पच्छिम दिशेस आहे, ते..! हुतात्मा  चौकातून पूर्व दिशेस 'वीर नरिमन रोड' नांवाचा जो सरळ  रस्ता  'अकबरअलीज'वरून  हॉर्निमन  सर्कलला  जातो,  तो  रस्ता  थेट  या  सेंट  थॉमस  चर्चलाच पोहोचतो. हे चर्च १६७६ साली बांधायला घेतलं व जवळपास चाळीस वर्षांनी  म्हणजे  १७१८  मध्ये  पूर्ण  होऊन  प्रार्थनेसाठी  खुलं  करण्यात आलं अशी माहिती विकीपेडिया देतो..या चर्चमुळेच पश्चिम रेल्वेच्या  मुंबईतील  सुरूवातीच्या  स्टेशनचं  नांव  'चर्चगेट'  ठेवण्यात आलं आहे... 
चर्चचा इतिहास थोडक्यात कथन करण्याचं कारण, मुंबईतल्या मैलांच्या दगडावरील अतरं या चर्चपासून मोजली गेली आहेत..'सेंट थॉमस चर्च' हे '0'- झीरोमाईल- मानलं गेलं होतं..मी पाहिलेल्या सर्व दगडांवर '....FROM ST. THOMAS'S CHURCH'  असा  स्पष्ट  उल्लेख  केलेला  दिसतो.. चर्च १७१८ मध्ये तयार झालं असं लक्षात घेतलं, तर अंतर दर्शवणारे हे मैलांचे दगड सन १७१८च्या नंतर बसवले गेले असावेत असा निष्कर्ष काढावा लागेल, म्हणजे त्याचं आजचं वय ३०० वर्ष व आसपास असल्याचं लक्षात येतं..!! 
मी बघीतलेला पहिला माईलस्टोन चिंचपोकळी स्टेशनच्या पश्चिमेस, ऑर्थर रोडच्या नाक्यावर आहे..लालबाग मार्केटकडून जो पुलरस्ता चिंचपोकळी स्टेशनच्या पश्चिम दिशेस  येतो  व  नंतर  डावीकडे  वळून  भायखळ्याच्या  दिशेने जातो,  अगदी  त्या  वळणावरच  डावीकडे  हा  'माईलस्टोन'  उभा  आहे. हा 'माईलस्टोन' सेंट थॉमस चर्च'पासूनच 'IV MILES' – चार मैल- अंतर दर्शवतो..या दगडावर कोरलेली 'IV MILES FROM ST. THOMAS'S CHURCH' ही अक्षरं जमिनीच्या पोटात लुप्त होण्याच्या मार्गावर असली तरी अजूनही स्पष्ट वाचता येतात.. 
 
 
मी पाहीलेला दुसरा माईलस्टोन सायनच्या पूर्वेस 'तामिळ संघम' नांवाची प्रसिद्ध संस्था ज्या गल्लीत उभी आहे, त्याच गल्लीत  उभा  आहे. मुंबईहून सायनच्या दिशेने जाताना, उजव्या बाजूचे 'गांधी मार्केट' गेलं की लगेच पुढे काही अंतरावर 'तामिळ संघम'ची इमारत लागते..ही इमारत, बाहेरचा मेन रोड  व मेन  रोडला  समांतर,  पण  आतून  जाणाऱ्या गल्लीच्या  टोकाशी  उभी  आहे..ही आतून जाणारी गल्ली पुन्हा पुढे  मेन  रोडला  मिळते  त्या गल्लीत हा माईलस्टोन उभा आहे.. हा असा मेन रोड पासून आत उभा का, याप्रश्नाचं उत्तर सापडत नाही..या दगडावार 'VIII MILES FROM ST.THOAMS'S CHURCH' – आठ मैल- अशी  अक्षरं  कोरली  आहेत..कोणी  स्थानिकाने या दगडास  पिवळा रंग दिला  आहे  तो  बहुतेक  त्यावरील  'चर्च'  या  अक्षरांमुळे त्याची  भाविक  वृत्ती  जागृत  झाल्यामुळे  असावा.. या  दगडावरील  सर्व  डिटेल्स  आजही  स्वच्छ  वाचता  येतात..हा दगड फुटपाथच्या पोटात समाधी घेण्याच्या तयारीत तिरका उभा आहे..!!
 
 
 तिसरा माईलस्टोन भेटला तो दादरच्या पूर्वेस असलेल्या 'चित्रा सिनेमा'च्या अगदी समोरच्या बाजूस असलेल्या गुरूद्वारा इमारतीच्या दक्षिण टोकाच्या फुटपाथवर..! ह्यावर 'VI MILES FROM ST.THOAMS'S CHURCH' – सहा मैल- अशी अक्षरे कोरली आहेत. 
 
चौथा माईलस्टोन हा दादर पश्चिम येथील कबुतरखान्याजवळ असलेल्या गोल देवळापासून पोर्तुगीज चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. नेमकं सांगायचं म्हणजे काही वर्षांपूर्वी या परिसरातल्या ज्या बस स्टॉप जवळ बॉम्ब स्फोट झाला होता, त्या बस स्टॉपच्या शेजारीच हा दगड दिसेल. हा मैलाचा दगड 'VII MILES FROM ST.THOAMS'S CHURCH' – सात मैल- अंतर दर्शवतो.
 असे आणखी दोन ते तीन माईलस्टोन्स मुंबईतील काळबादेवी, गोवालिया टंक आणि ताडदेवच्या भाटीया हॉस्पिटलपाशी असल्याचा उल्लेख नेटवर सापडतो.
आता शिल्लक असलेले व मी पाहिलेले मैलाचे दगड आता जेमतेम दोन-अडीच फुट जमिनीवर आहेत. हे सर्वच माईलस्टोन्स निर्वासितासारखे असहाय्य होऊन फुटपाथवर दुर्लक्षित आहेत. दादरच्या गोल देवळाजवळच्या माईलस्टोनची अवस्था फारच बिकट आहे. केवळ एक फुटभर शिल्लक असलेल्या या माईलस्टोनवरील केवळ ‘VII’ एवढीच अक्षरे वाचता येतात, बाकी सर्व फुटपाथने गिळून टाकलंय. हे सर्व मैलाचे दगड ‘ग्रेड वन’च्या ‘हेरीटेज’ प्रकारचे असावेत. हा आपला इतिहास आहे, वारसा आहे..! यांची जपणूक करून ते भावी पिढ्यांच्या माहितीसाठी सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. ३००च्या दरम्यान वय असणाऱ्या या पुराणपुरुषांना वृद्धाश्रमात (म्युझियममध्ये) न हलवता, आहे त्याच जागी त्यांना त्यांच्या मुळच्या स्वरुपात आणून, शेजारी त्यांची थोडक्यात माहिती देणारी पाटी लावणे शक्य नाही का?
 
- गणेश साळुंके