संतोष येलकर/अकोलाजन्म-मृत्यूचा दर ठरविण्यासाठी राज्यात ३0६ नमूना नोंदणी पाहणी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या जिल्हानिहाय केंद्रांवर जन्म-मृत्यूच्या दराबाबतची माहिती नोंदविण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.दर दहा वर्षांनी होणार्या जनगणनेची आकडेवारी प्रसिध्द झाल्यानंतर, जन्म व मृत्यूचा दर ठरविण्यासाठी केंद्र शासनाच्या जनगणना विभागामार्फत नमूना नोंदणी पाहणी केंद्र निश्चित केली जातात. त्यानुसार सन २0११ च्या जनगणनेवर आधारित जनगणना विभागाच्या राज्य कार्यालयामार्फत राज्यभरात ३0६ नमूना नोंदणी पाहणी केंद्र गत जानेवारीमध्ये निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर जन्म व मृत्यू बाबतची माहिती नोंदविण्याचे काम सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. केंद्र परिसरातील गावांमधील जन्म-मृत्यूची नोंदीची माहिती आशा, अंगणवाडी सेविकांकडून दरमहा संबंधित केंद्रांकडे सादर करण्यात येणार आहे. ही माहिती राज्याच्या अर्थ व सांख्यिकी विभागामार्फत सादर केली जाते, जिल्हानिहाय संकलित करण्यात आलेली ही माहिती जनगणना विभागाकडे पाठविली जाते. या माहितीच्या आधारे दर तीन, सहा, नऊ आणि बारा महिन्यातील जिल्हानिहाय जन्म-मृत्यू दराचे अंदाज निश्चित केले जातात. *नमूना नोंदणी केंद्रांची लवकरच पाहणी!जन्म-मृत्यूचे दर ठरविण्यासाठी माहिती संकलित करण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी राज्यात निश्चित करण्यात आलेल्या नमूना नोंदणी केंद्रांना जनगणना विभागाचे क्षेत्रिय अधिकारी भेट देऊन पाहणी करतील. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात या केंद्रांमार्फत माहिती संकलित करण्याचे काम सुरु होणार आहे.
जन्म-मृत्यूचा दर नोंदविण्यासाठी राज्यात ३0६ केंद्र
By admin | Published: September 01, 2014 1:35 AM