शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

३०० शिक्षकांवर ‘कलम ३०७’

By admin | Published: October 06, 2016 5:45 AM

मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३०० शिक्षकांविरुद्ध कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि दंगलीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले

औरंगाबाद : मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३०० शिक्षकांविरुद्ध कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि दंगलीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून, ५९ शिक्षकांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंगळवारी औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राज्यभरातील शिक्षक मंडळी सहभागी झाली होती. महिला शिक्षकांची उपस्थितीही लक्षणीय होती. मात्र, या मोर्चाला हिंसक वळण लागून २१ शिक्षक आणि १३ पोलीस जखमी झाले. पोलिसांनी बळाचा वापर करत, शिक्षकांवर लाठीमार केला, असा आरोप कृती समितीने केला आहे, तर आंदोलनकर्त्यांनी अर्वाच्च भाषा वापरत, पोलिसांवर दगडफेक केल्याने जमावाला पांगविण्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.आंदोलकांवर नोंदविले गंभीर गुन्हेया घटनेनंतर औरंगाबाद पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेत, विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह तब्बल तीनशे शिक्षकांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले. यामध्ये कलम ३०७ ( खुनाचा प्रयत्न करणे), ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) यासह दंगलीचे कलम ३३३, ३३६, ३३७, १४३, १४७, १४८, १४९ भादंविसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा कायदा १९८४ चे कलम ३ व ४ व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट १९३२ चे कलम ७ सह कलम १३५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या सर्व कलमांन्वये कोर्टात गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना मोठी शिक्षा होऊ शकते.................४७ शिक्षकांची हर्सूल कारागृहात रवानगीसर्व आरोपी शिक्षकांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने १२ पदाधिकाऱ्यांना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर ४७ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. त्या ४७ जणांची रात्री उशिरा हर्सूलमध्ये रवानगी करण्यात आली. या शिक्षकांमध्ये राहुल भोसले (रा. बेलोरो, जाफराबाद, जालना), भास्कर कड (रा. जाफराबाद, जालना), गणेश शेळके (रा. बेलोरोे, जालना), शंकर उर्किडे (रा. टेंभुर्णी, जालना), सुदेश मोरे (रा. सुंदरखेड, बुलडाणा), सुनील दुमाने (रा. वसमत, हिंगोली), सिद्धार्थ कोंगराव (रा. दैठणा, परभणी), तुकाराम कदम (रा. संतसेनानगर, परभणी), गजानन देशमुख (रा. परभणी), मुंजाजी शिंदे (रा. धसाडी, परभणी), विलास आवारे (रा. चिखली, आष्टी, बीड), अर्जुन पाखरे (रा. रांजणगाव, औरंगाबाद), शेख मुबीन (रा. मुदखेड, नांदेड), शेख इर्शाद (रा. लोणार, बुलडाणा), इरफान खान (रा. रिसोड, वाशिम), शेख नय्युम (रा. वाघी, वाशिम), अर्जुन पळसकर (रा. पळशी, औरंगाबाद), सईद खान (रा. रिसोड, वाशिम), मोहंमद नदीम (रा. वाशिम), लक्ष्मण घ्यार (रा. शेणगाव, हिंगोली), संतोष राठोड (रा. जांभळी, भोकर, नांदेड), सुरेश गवळी (रा. सिडको, औरंगाबाद), चतुर्भुज लोकरे (रा. बेगळी, उस्मानाबाद), महादेव पट्टे (रा. काकरंबा, तुळजापूर), प्रवीण काळे (रा. पुंडलिकनगर, औरंगाबाद), विलास घोंगे (रा. देऊळगाव राजा, बुलडाणा), रामेश्वर पवार (रा. आसेगाव, रिसोड, वाशिम), अनिल भावसार (रा. शिंगापूर, अक्कलकुवा, नंदुरबार), विजय द्वारकुंडे (रा. जयभवानीनगर, औरंगाबाद), गणेश पवार (रा. आनंदनगर, औरंगाबाद), श्रीकांत गरुड (रा. वरखेड, पालम, परभणी), संतोष देशमुख (रा. केज, बीड), रंगनाथ भोपळे (रा. जाफराबाद, जालना), भरत शेळके (रा. देऊळगाव राजा, बुलडाणा), सुभराव पवार (रा. बोरगाव, केज, बीड), संदीप किरतकर (रा. पाथूर, अकोला), संदीप पवार (रा. ननासी, दिंडोरी, नाशिक), अनिल पगार (रा. ननासी, नाशिक), अमर पाटील (रा. जयसिंगपूर, कोल्हापूर), भाऊसाहेब काळे (रा. सिडको, औरंगाबाद), सचिन पाचबोले (रा. पातूर, अकोला), आदिनाथ अडसरे (रा. रांजणगाव, औरंगाबाद), रमेश उकर्डे (रा. टेंभुर्णी, जालना), मच्छिंद्र जाधव (रा. शिरोळ, कोल्हापूर), प्रदीप कोळी (रा. शिरोळ, कोल्हापूर), नीलेश गरुड (रा. विराणे, मालेगाव), कैलास पाबळे (पानेवाडी, जालना) या शिक्षकांचा समावेश आहे. .....................अटकेत असलेले पदाधिकारीसीताराम म्हसकर (रा. मापोडा, खालापूर, राजगड), मनोज पाटील (रा. बालजीनगर, औरंगाबाद), खंडेराय जगदाळे (रा. शिरोळ, कोल्हापूर), शिवराम म्हस्के (रा. बोरसर, कन्नड, औरंगाबाद), वाल्मीक सुरासे (रा. तिरुपती पार्क, सिडको, औरंगाबाद), रवींद्र मंडावर (रा. वैजापूर, औरंगाबाद), मिर्झा सलीम बेग (रा. सादातनगर, औरंगाबाद), अन्सारी मोहंमद जावेद (रा. लेबर कॉलनी परिसर, औरंगाबाद), अभिजित कदम (रा. पूर्णा, परभणी), रमेश देशमुख (रा. पाथरी, परभणी), संदीप देवरे (रा. गारखेडा, भोकरदन, जालना), दीपक इंगळे (रा. सातगाव, म्हसला, बुलडाणा) या १२ पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.