नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या खात्यातून दोन बनावट धनादेशांद्वारे ३१ लाखांची रक्कम काढण्यातआली आहे. या प्रकरणी यवतमाळ येथे पोलीस तक्रार करण्यात आली आहे.नागपूर विद्यापीठाचे ‘बँक आॅफ इंडिया’मध्ये खाते आहे. या खात्यातून होणारे आर्थिक व्यवहार चेकमार्फत करण्यात येतात. याची सर्व जबाबदारी वित्त खात्याकडे असते. एक लाखांवरील अधिक रकमेच्या व्यवहारासाठी वित्त व लेखा अधिकाऱ्यांची स्वाक्षरी अनिवार्य असते. विद्यापीठाच्या या खात्यातून परस्पर २३ लाख व ८ लाख रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले. याबाबत चौकशी केली असता यवतमाळ येथील कॅनरा बँकेतअजय जैन नावाच्या व्यक्तीने‘बँक आॅफ इंडिया’चे दोन‘बोगस’ चेक स्वत:च्या खात्यात ‘डिपॉझिट’ केले व त्यातून हीरक्कम काढल्याची बाब समोरआली. यानंतर विद्यापीठाचे प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.अनिल हिरेखन यांनी तत्काळ यवतमाळ पोलिसांत तक्रार दाखल केली. ‘महावीर कन्स्ट्रक्शन’ या नावाने हे दोन्ही चेक होते व यावर डॉ. हिरेखन यांची बनावट स्वाक्षरी होती. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठाकडेच असलेल्या चेकवरील क्रमांक या चेकवर होता. (प्रतिनिधी)
नागपूर विद्यापीठाला ३१ लाखांचा गंडा
By admin | Published: February 24, 2016 2:17 AM