शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By admin | Published: March 08, 2017 2:09 AM

सैन्य भरती घोटाळ्यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, एका आरोपीच्या बँक लॉकरमधून ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास अधिकाऱ्यांना यश आले आहे.

ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, एका आरोपीच्या बँक लॉकरमधून ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास अधिकाऱ्यांना यश आले आहे.सैन्य भरती मंडळातर्फे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) २६ फेब्रुवारी रोजी ४ पदांसाठी घेतलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या २४ आरोपींना ठाणे पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील संतोष शिंदे हा मुख्य आरोपींपैकी एक असून, तपासादरम्यान त्याच्या आर्थिक उलाढालींबद्दल पोलिसांना संशय आला होता. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक रविवारी फलटण येथे गेले होते. पोलिसांनी संबंधित शिंदे याचे खाते असलेल्या बँकेच्या लॉकरची झडती घेतली असता, २१ लाख रुपये रोख आणि सुमारे १0 लाख रुपयांचे दागिने आढळले. पोलिसांनी हा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींनी प्रश्नपत्रिकेचा सौदा १ कोटी ३५ लाख रुपयांमध्ये केला होता. त्यापैकी ५0 लाख रुपयांचा अग्रीम आरोपींना देण्यात आला होता. ही रक्कम रविकुमार, धरमसिंग, निगमकुमार पांडे आणि संतोष शिंदे यांनी आपसात वाटून घेतली होती. संतोष शिंदे याच्याजवळील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित आरोपींचे व्यवहार तपासण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. सद्य:स्थितीत या प्रकरणाचा तपास फलटण आणि नागपूर या दोन शहरांभोवती फिरत आहे.कर्मचाऱ्यांना भेटीसैन्य भरती घोटाळ्यातील एका आरोपीने नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना महागडे मोबाइल फोन भेट दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. १७ हजार रुपयांचा एक याप्रमाणे तीन मोबाइल फोन भेट देण्याचे आणि सैन्य भरती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ते स्वीकारण्याचे कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.पोलीस पथक नागपुरातया प्रकरणाचा तपास सातारा जिल्ह्यातील फलटण आणि नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयाभोवती फिरत आहे. आरोपींच्या जबाबातून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यातील सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसांचे पथक नागपुरात दाखल झाले आहे.