पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त (दहावी) परीक्षा येत्या मंगळवारी (दि. ७) सुुरू होत आहे. परीक्षेसाठी पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ३२ केंद्र आहेत. तर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची एकूण संख्या २३ हजार ५०४ एवढी आहे. दहावी परीक्षेंतर्गत घेण्यात येणाऱ्या विज्ञान व आयसीटी या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व आॅनलाइन कलचाचणीचा आज (गुरुवार) अखेरचा दिवस आहे. तर मंगळवारपासून (दि. ७) लेखी परीक्षेस सुरुवात होत आहे. या ३२ केंद्रांमध्ये बा.रा. घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय - सांगवी (विद्यार्थिसंख्या-७०३), दि न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल - नवी सांगवी (८१७), हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक स्कूल (८४५), जयहिंद हायस्कूल (८५०), नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्यु. कॉलेज - पिंपरी (११७४), अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय - पिंपळे सौदागर (६२१), टी एस मुथ्था कन्या प्रशाला (७००), न्यू इंग्लिश स्कूल भोई आळी ( १३०६), माध्यमिक विद्यालय, पीसीएमचे काळभोरनगर (६०३), श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय - मोहननगर (८५७), कमलनयन बजाज स्कूल, एमआयडीसी - चिंचवड (६०३), सेंट उर्सुला हायस्कूल (५७३), श्री म्हाळसाकांत विद्यालय (९८१), श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय - आकुर्डी( ७०७), पी. सी. एम. सी माध्यमिक विद्यालय प्राधिकरण निगडी (५५२), प्रेरणा माध्यमिक विद्यालय लक्ष्मणनगर - थेरगाव (११८६), गोदावरी हिंदी विद्यालय - चिंचवड (९५२), सीएमएस इंग्लिश मीडियम स्कूल प्राधिकरण (५३०), पीसीएमसी माध्यमिक विद्यालय- थेरगाव (८३६), ज्ञानदीप विद्यालय व सौ अनुसया वाढोकर उच्च माध्यमिक विद्यालय - रुपीनगर (७२५), मॉडर्न हायस्कूल - यमुनानगर (७२७), स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय दापोडी (९२७), पीसीएमसी माध्यमिक विद्यालय - कासारवाडी (३८८), भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय - भोसरी (८३०), पीसीएमसी माध्यमिक विद्यालय नेहरुनगर - पिंपरी (५९७), श्री नागेश्वर विद्यालय - मोशी (६३१), छत्रपती श्री शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय (७६२), सयाजीनाथमहाराज माध्यमिक विद्यालय वडमुखवाडी (७४७), श्री स्वामी समर्थ विद्यालय - इंद्रायणीनगर (७३५), प्रियदर्शनी हायस्कूल - भोेसरी ( ६९८), ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय - निगडी (३०८), राजा शिवछत्रपती विद्यालय- तळवडे (४४८) या विद्यालयांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)>परीक्षा केंद्राची पाहणी करण्याकरिता पिंपरी-चिंचवड मनपाच्या शिक्षण मंडळाचे एक व माध्यमिक शिक्षण समितीचे एक अशी दोन पथके आहेत. प्रत्येक पथकात पाच सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, परीक्षा केंद्रावर कोणतीही अडचण येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली आहे. - अलका कांबळे, प्रभारी शिक्षणाधिकारी
दहावीची ३२ केंद्रे
By admin | Published: March 02, 2017 1:44 AM