शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

‘ज्ञानराधा’ची ३३३ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 12:35 IST

Mumbai News: ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुरुवारी सोसायटीची ३३३ कोटी ८२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली.

 मुंबई -  ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुरुवारी सोसायटीची ३३३ कोटी ८२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये सुरेश कुटे यांच्या कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरी या कंपन्यांच्या जमिनी, इमारती, प्रकल्प आणि मशिनरीचा समावेश आहे. या मालमत्ता सातारा व अहमदनगर जिल्ह्यात आहेत.

यापूर्वी ईडीने १० ऑक्टोबर रोजी सोसायटीची १००२ कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यावेळी जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना येथील काही इमारती आणि भूखंडांचा समवाेश होता. सप्टेंबर महिन्यात ईडीने सोसायटीची ८५ कोटी ८८ लाख रुपयांची अचल मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथील काही फ्लॅट, कार्यालयांची जागा आणि भूखंड आदींचा समावेश होता. आतापर्यंत सोसायटीची एकूण १०९७ कोटी ८७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

ज्ञानराधा सोसायटीने १२ ते १४ टक्के व्याजदराने परतावा देणाऱ्या अनेक ठेव योजना सादर केल्या होत्या. तसेच, सोसायटीने सोने, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, मुदत ठेवींवर कर्ज अशा कर्ज योजनादेखील सादर केल्या होत्या. सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी या दोघांच्या नियंत्रणाखाली सोसायटीचे काम सुरू होते. त्यांनी राज्यभरातील किमान चार लाख गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आले. काही ठराविक गुंतवणूकदारांना सुरुवातीला त्यांनी परतावा दिला. मात्र, त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांना एक रुपया देखील परत मिळाला नाही.

पैसे काढून घेतली वैयक्तिक मालमत्ताकुटे यांनी २३१८ कोटी रुपयांचा अपहार करत ते पैसे आपल्या अन्य कंपन्यांत कर्ज रूपाने वळविल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. हे पैसे नंतर रोखीने काढून घेत त्याद्वारे त्यांनी वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचेही तपासात दिसून आले आहे. याप्रकरणी सुरुवातीला राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते. मात्र, या प्रकरणात मनी लॉंड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने देखील याचा तपास सुरू केला होता.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMaharashtraमहाराष्ट्र