पुणे : वीजग्राहकांनी सुरक्षा ठेव म्हणून जमा केलेल्या रकमेवरील व्याजापोटी ३४ कोटी ४७ लाख रुपये महावितरणला मिळाले. ही रक्कम महावितरणने वीजग्राहकांमध्ये वितरित केल्याने मे आणि जुलै महिन्यांत वीजबिल कमी आले आहे.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार वीजजोड घेताना प्रत्येक ग्राहकाला महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून काही ठरविक रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. संबंधित ग्राहकाकडून वापरण्यात येणाऱ्या विजेच्या बिलानुसार सरासरी एका महिन्याची रक्कम ठेव म्हणून महावितरण घेते. या ठेवीवर ९.५ टक्के व्याज देण्याचेही आदेश आयोगाने दिले आहेत. हा परतावा महावितरणने ग्राहकांच्या मे आणि जुलै महिन्याच्या वीज बिलांमध्ये दिला आहे. त्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या बिलापेक्षा या दोन महिन्यांचे वीजबिल कमी आले आहे.
वीजग्राहकांना ३४ कोटी रुपयांचा परतावा
By admin | Published: September 01, 2015 1:23 AM