सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे आणि अतीतच्या दरम्यान ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या एसटी बसवर मंगळवारी रात्री सशस्त्र दरोडा पडला. पिस्तुलीतून गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी बसमधील कुरिअर कर्मचाऱ्याजवळील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे ३४ लाखांचा ऐवज लंपास केला. बोरिवलीला निघालेली बस मंगळवारी रात्री ढाब्यावर जेवणासाठी थांबली. बसमधून गोपीनाथ तानाजी कदम हे प्रवास करीत होते. ते तिरूपती कुरिअरचे कर्मचारी आहेत. ढाब्यालगत असलेल्या स्नॅक्स सेंटरमधून वडापाव घेऊन कदम बसमध्ये बसले.त्यांच्या पुढे दोघे जण, तर मागून दोघेजण बसमध्ये चढले. पुढील दोघांनी कदम यांच्यावर पिस्तूल रोखले, तर मागील दोघांपैकी एकाने त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. इतर दोघांनी कदम यांच्या दोन बॅगा ताब्यात घेतल्या. कदम यांनी धरून ठेवलेली बॅग ताब्यात घेण्यासाठी एकाने त्यांच्या हातावर वार केला. बॅगा ताब्यात येताच दरोडेखोर बसमधून खाली उतरले.
गोळीबार करून ३४ लाखांची लूट
By admin | Published: September 17, 2015 1:17 AM