शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वडगावात ३४ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त

By admin | Published: June 09, 2017 1:02 AM

अन्न सुरक्षा विभागाने मावळ तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई करत ३४ लाख २० हजार रुपयांचा गुटखा वेगवेगळ्या तीन वाहनांमधून जप्त केला

लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव मावळ : येथे गुरुवारी अन्न सुरक्षा विभागाने मावळ तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई करत ३४ लाख २० हजार रुपयांचा गुटखा वेगवेगळ्या तीन वाहनांमधून जप्त केला. याबाबत श्रीकांत बाळासाहेब चांदेकर (रा. वडगाव मावळ) या इसमावर कारवाई केली असून, तिन्ही वाहनांच्या चालकांना अटक केली आहे. गणपत कोकणे म्हणाले, वडगाव येथे एम एच १२ ३४४१ या टेम्पोतून ५ लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीची पानमसाल्याची ३ हजार ४०० पाकिटे जप्त करण्यात आली. याच वाहनातून पानमसाल्याची छोटी १० हजार पाकिटे (१२ लाख रुपये), सुगंधित तंबाखूची ३ हजार ४०० पाकिटे (१४ लाख ४६ हजार रुपये), तर सुगंधित तंबाखूची १६ ग्रॅमची १० हजार पाकिटे ( ३ लाख रुपये) जप्त करण्यात आली. एम. एच. १२ सी. एच़ ४४९९ या वाहनामधून पानमसाल्याची १८० ग्रॅम वजनाची १४०० पाकिटे (सुमारे २ लाख ४६ हजार), पानमसाल्याची २६०० छोटी पाकिटे (३ लाख १२ हजार रुपये) सुगंधित तंबाखूची १४०० पाकिटे (६१ हजार ६०० रुपये), ६०० ग्रॅम तंबाखूची २६०० पाकिटे (सुमारे ७८ हजार रुपये) जप्त करण्यात आली. एम. एच. १२ इ. डी ९३६५ या वाहनामधून १८० ग्रॅम वजनाची १२०० पाकिटे (सुमारे २ लाख ११), १२० ग्रॅम वजनाची १४०० पाकिटे (सुमारे १ लाख ६८ हजार), पानमसाल्याची १२०० छोटी पाकिटे (सुमारे ५२ हजार ८०० रुपये) आणि १६ ग्रॅम वजनाची गुटख्याची १४०० पाकिटे (४२ हजार रुपये) जप्त करण्यात आली.मावळातील कारवाईअन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी गणपत कोकणे, देवानंद वीर, संतोष सावंत, अजित म्हेत्रे व वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, सहायक निरीक्षक गणेश लोकरे यांनी ही कारवाई केली.