- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला असून, या संस्थेला केंद्र सरकारने ३५ कोटी रुपयांचा अनुदानाचा पहिला हप्ता मंजूर केला. महाराष्ट्रातील कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता उपचारासाठी प्रभावशाली यंत्रणा राज्यात उभारण्यासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय औरंगाबादमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत घेण्यात आला होता. केंद्राच्या कुटुंब व आरोग्य कल्याण विभागामार्फत नॅशनल प्रोग्रॅम फॉर प्रिव्हेंशन अॅण्ड कंट्रोल आॅफ कॅन्सर, डायबेटीस, सीव्हीडी आणि स्ट्रोक या कार्यक्रमांतर्गत राज्य कर्करोग संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या भागीदारीने प्रत्येक राज्यात कर्करोग संस्थेची स्थापना करण्यात येईल. त्यानुसार प्रत्येक राज्यासाठी मिळणाऱ्या एकूण १२० कोटी रुपये खर्चापैकी केंद्राच्या वाट्यातील ७५ टक्के निधी संबंधित राज्यांनी समाधानकारक कार्यवाही केल्यानंतरच देण्यात येईल.
औरंगाबादच्या कर्करोग संस्थेसाठी ३५ कोटी
By admin | Published: June 17, 2017 12:53 AM