स्नेहा मोरे
मुंबई, दि. 1 - तब्बल तीन महिने अंगठ्याविना आयुष्य काढल्यानंतर 35 वर्षीय व्यक्तीला त्याच्या उजव्या हाताने जेवणे शक्य झाले. यांत्रिक भाग तयार करणाऱ्या कारखान्यात काम करणाऱ्या ऋषी कुरणे यांचा (नाव बदलले आहे) अंगठा एका यंत्रात अडकला आणि त्यांना तो गमवावा लागला. तत्काळ उपचार करण्यासाठी दुखऱ्या भागावर त्वचा लावण्यात आली, पण ३ महिने कुरणे घरी होते. अंगठा नसल्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन क्रिया करणे, जेवण करणे किंवा विविध वस्तू पकडणे कठीण जात होते.
कॉस्मेटिक सर्जन डॉ. विनोद विज यांनी अंगठ्याच्या जागी पायाच्या अंगठ्याचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. असे केल्याने दैनंदिन क्रिया करणे सुलभ होणार होते. शस्त्रक्रियेनंतर आपल्याला कामावर पुन्हा रुजू होता येईल या आशेने कुरणे यांनी हा सल्ला मान्य केला. शस्त्रक्रियेनंतर एका महिन्याने कुरण खूश आहेत कारण ते आपल्या उजव्या हाताने जेवू शकतात आणि वस्तूही हातात धरू शकतात. या नव्या अंगठ्यामध्ये बळ येण्यास वेळ लागेल, पण सकारात्कम परिणाम दिसून येत आहेत.ह्लहाताच्या अंगठ्याच्या जागी पायाच्या अंगठ्याचे प्रत्यारोपण करणे ही अत्यंत दुर्मीळ शस्त्रक्रिया आहे. भारतात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच ठिकाणी ही शस्त्रक्रिया होते आणि ही शस्त्रक्रिया करून घेणारा माझा हा सहावा रुग्ण आहे. या शस्त्रक्रियेस सुमारे ६ तासांचा कालावधी लागतो. ही खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते आणि यातील तांत्रिकतेमुळे काठीण्यपातळी अजून वाढते. या शस्त्रक्रियेत तुम्हाला तुमच्या पायाचा अंगठा गमवावा लागतो. त्यामुळे कुरणेंसारख्या केवळ काही व्यक्ती ही शस्त्रक्रिया करवून घेण्यास तयार होतात.ह्व, असे कॉस्मेटिक सर्जन डॉ. विनोद विज म्हणाले.
कुरणे कळंबोली येथे आपले आईवडील, पत्नी आणि तीन वर्षीय मुलासोबत राहतात. शस्त्रक्रियेनंतर, ते ज्या कारखान्यात काम करत होते, त्यांनी कुरणेंच्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्याचे ठरविले आहे; त्यामुळे कुरणे कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. ह्लअंगठ्याशिवाय जगणे अत्यंत कठीण होते. मी डाव्या हाताने जेवत होतो आणि इतर अनेक क्रिया करणे मला शक्य होत नव्हते. शस्त्रक्रियेनंतर हे सुलभ झाले आहे. मी अंगठ्यामध्ये पूर्ण बळ येण्याची वाट पाहत आहे.ह्व, असे ऋषी कुरणे म्हणाले.सुरुवातीला जेव्हा रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा आम्ही पोटावरील थोडी त्वचा काढून ती अंगठ्यावर लावली. अंगठ्याचा पूर्ण चेंदामेंदा झाल्याने ताबडतोब त्यावर उपचार करणे शक्य नव्हते. पायाचा अंगठा त्याच व्यक्तीचा असल्याने अंगठा पुन्हा तयार करणे सोपे होते. रुग्णाला दैनंदिन क्रिया करणे सुलभ होत आहे आणि विविध वस्तू पकडण्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करत आहेत.ह्व, अशी पुष्टी डॉ. विज यांनी जोडली.