शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

नाशिक विभागात ३७ कोटींचा घोटाळा

By admin | Published: May 13, 2017 2:21 AM

ठाणे, अमरावती, नागपूरपाठोपाठ नाशिकमध्येही आदिवासी योजनांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. नाशिक विभागातील नाशिक, कळवळ, राजूर, तळोदा, नंदुरबार व यावल

दीप्ती देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाणे, अमरावती, नागपूरपाठोपाठ नाशिकमध्येही आदिवासी योजनांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. नाशिक विभागातील नाशिक, कळवळ, राजूर, तळोदा, नंदुरबार व यावल या सहा प्रकल्प अधिकाऱ्यांनी एकूण ३७ कोटी २५ लाख २३ हजार ८०० रुपयांचा घोटाळा केला आहे. तसेच काही योजनांमध्ये करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचे एम. जी. गायकवाड समितीने अहवालात म्हटले आहे.नाशिकमध्ये ‘कन्यादान’ योजनेअंतर्गत ८०० विवाह झाल्याचा दावा प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला होता. लाभार्थ्यांची खोटी यादी दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. सीबीआय चौकशी सुरू आहे. त्याशिवाय यावल येथे दुभती जनावरे खरेदी-वाटप प्रकणात २ कोटी ४३ लाख ५३ हजार रुपयांचा घोटाळा झाला. त्याच्या चौकशीची शिफारस समितीने केली आहे. कळवण प्रकल्प अधिकाऱ्यांनीही दुभती जनावरे वाटपाबाबत खोटी कागदपत्रे बनवून १४ कोटी ५७ लाख १६ हजार ३८० रुपये लाटले. त्याचीही सीबीआय चौकशी सुरू असल्याने समितीने त्यावर मत नोंदवण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये हडपून संबंधित संस्थांनाही त्याचा लाभ दिला आहे. वस्तू खरेदी करताना ठराविक कंत्राटदारांनाच वारंवार कंत्राट दिले आहे. निविदा प्रक्रियेला बगल देत प्रकल्प अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केला.नाशिकच्या बहिराम मोतीराम यांनी अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीत राज्य सरकारने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे. (समाप्त) सहा प्रकल्प विभागांचा समावेश२००४ ते २००९ या कालावधीत नाशिकमध्ये ६ कोटी ३२ लाख ९६ हजार ८७२ रुपये, कळवण २ कोटी ८२ लाख २७ हजार ८८१, राजूर २ कोटी ९९ लाख ७१ हजार ४९० रुपये, नंदुरबार ६ कोटी ८२ लाख २ हजार ७१०, यावल २ कोटी २४ लाख ६८ हजार ८१६ रुपये तर तळोदाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी १६ कोटी ३ लाख, ५६ हजार ३१ रुपयांचा घोटाळा केला आहे.