मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी यंदा एकूण २२४ विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी ६0 विशेष फेऱ्यांची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. तर ३८ फेऱ्यांची घोषणा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली असून यामध्ये वान्द्रे टर्मिनस-मडगाव-वान्द्रे टर्मिनस आणि अहमदाबाद-मडगाव-अहमदाबाद ट्रेनचा समावेश आहे. ट्रेन नंबर 0९00७ आणि 0९00८ वान्द्रे टर्मिनस-मडगाव-वान्द्रे टर्मिनस ट्रेनच्या आठ फेऱ्या होणार आहेत. यात ट्रेन क्रमांक 0९00७ वान्द्रे येथून सप्टेंबर महिन्यात १४,१६,२१ आणि २३ तारखेला सकाळी १0.१0 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी ३.३0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0९00८ मडगाव येथून १५,१७,२२ आणि २४ सप्टेंबर रोजी ५.३0 वाजता सुटून वांद्रे येथे त्याच दिवशी २३.२५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन बोरीवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मदुरे, थिविम, करमाळी स्थानकांवर थांबेल. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर 0९00९ आणि 0९0१0 वान्द्रे टर्मिनस-मडगाव-वान्द्रे टर्मिनस ट्रेनच्या १४ फेऱ्या होणार आहेत. 0९00९ ट्रेन वांद्रे येथून १२,१५,१७,१९,२२,२४ आणि २७ सप्टेंबरला 00.१५ वाजता सुटून मडगाव येथे १६.३0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0९0१0 मडगाव येथून याच तारखेला मडगाव येथून २१.00 वाजता सुटून वान्द्रे येथे १३.२0 वाजता पोहोचेल. ही ट्रेनदेखील ट्रेन 0९00७ आणि 0९00८ प्रमाणेच थांबणार असून अंधेरी, परनेमला थांबेल. ट्रेन क्रमांक 0९४१६ आणि 0९४१५ अहमदाबाद-मडगाव-अहमदाबाद ट्रेनच्या १६ फेऱ्या होणार आहेत. ट्रेन क्रमांक 0९४१६ ट्रेन अहमदाबादहून १२, १३, १७, १९, २0, २४, २६, २७ सप्टेंबरला १६.00 वाजता सुटून मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १६.३0 वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 0९४१५ मडगावहून १३, १४, १८, २0, २१, २५, २७, २८ सप्टेंबर रोजी २१.00 वाजता सुटून अहमदाबाद येथे २0.३0 वाजता पोहोचेल.
गणेशोत्सवासाठी ३८ विशेष फेऱ्या
By admin | Published: July 30, 2015 2:36 AM