शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

राज्यातील ३८ स्थानके पुनर्विकासाच्या ‘ट्रॅक’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2016 4:56 AM

देशभरातील ए-१ आणि ए श्रेणीतील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने नुकताच घेतला.

सुशांत मोरे,

मुंबई- देशभरातील ए-१ आणि ए श्रेणीतील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने नुकताच घेतला. यातील ३८ स्थानके ही महाराष्ट्रातील आहेत. या कामाला गती देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने विकासकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. विकास करताना स्थानक व परिसरात फूड कोर्ट, हॉस्पिटल, पार्किंग, वैद्यकीय सुविधांसह अनेक सुविधा देण्यात येतील. प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि त्यामुळे अपुऱ्या पडत जाणाऱ्या सुविधा तसेच नव्या सोयिसुविधांची मागणी पाहता या श्रेणीतील स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. ए-१ आणि ए श्रेणीतील ३३२ स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. आंध्र प्रदेश, ओडिसा, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आसाम या राज्यातील स्थानकेही आहेत. राज्यातील ३८ स्थानकांमध्ये ए-१ श्रेणीतील दहा तर २८ ए श्रेणीतील स्थानके आहेत. यात ए-१ श्रेणीतील महत्वाचे असलेल्या मुंबईतील सीएसटी, एलटीटी, कल्याण, दादर या तर महाराष्ट्रातील नागपूर स्थानके आहेत. देशभरातील पुनर्विकास करण्यात येणाऱ्या स्थानकांच्या कामांना गती देण्यासाठी आता या कामात रुची दाखवणाऱ्या विकासकांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. प्रस्तावावर रेल्वे मंत्रालयाकडून अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. >ए-१ श्रेणीतील स्थानकेसीएसटी, एलटीटी, पुणे,नागपूर, कल्याण,दादर, ठाणे, सोलापूर, मुंबई सेन्ट्रल (मेन), वांद्रे टर्मिनसए श्रेणीतील स्थानकेअकोला, अमरावती, बडनेरा, भुसावळ, चाळीसगाव, जळगाव, कुर्डूवाडी, लातूर, मनमाड, मिरज, नाशिक रोड, पनवेल, साईनगर शिर्डी, शेगाव, अहमदनगर, दौंड, कोल्हापूर, कोपरगाव, लोणावळा, बल्लारशहा, चंद्रपूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद, जालना, नागरसोल, परभणी जक्शन, गोंदियापुनर्विकासातून सुविधास्थानकाच्या इमारतीचा पुनर्विकास करताना आदर्श असे स्थानक निर्माण केले जाईल. स्थानकातील प्रवेशव्दार हे फेरीवाला मुक्त करुन मोकळे ठेवले जातील. प्लॅटफॉर्मची लांबी व रुंदी वाढवतानाच पादचारी पुलांचीही रुंदी वाढवण्यावर भरस्वच्छ व आधुनिक असे वॉश रुम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, इंटनरेट, एटीएम उभारले जाईल. स्थानक हद्दीत शॉपिंग, हॉस्पिटल, फूड कोर्ट उभारणारहेलिपॅडपरिसरात पार्किंगची उत्तम सोय>रेल्वे बोर्डाचे सदस्य (वाहतूक) मोहम्मद जमशेद हे मुंबई दौऱ्यावर असताना ए-१ व ए श्रेणीतील स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असल्याचे सांगतानाच सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली होती. यात मुंबईतील स्थानकांचाही समावेश होता.