मुंबई : राज्य सरकारने आयोजित केलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला. १० लाख कोटी रुपये गुंतवणुकीची अपेक्षा असताना, तब्बल १६ लाख ८८३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. यातून ३८ लाख ८३ हजार ४६१ लोकांसाठी रोजगार निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.गुंतवणूक परिषदेत एकूण ४,१०६ करार झाले. त्याद्वारे ३६ लाख ७७ हजार १८५ रोजगारनिर्मितीचे आश्वासन देण्यात आले आहे. याखेरीज सरकारकडून १०४ प्रकल्पांत गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली असून, त्याद्वारे २ लाख ०६ हजार २७६ इतक्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. या परिषदेच्या समारोपात फडणवीस यांनी सांगितले की, यंदा गुंतवणूक केवळ सामंजस्य करारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली नाही, तर गुंतवणुकीची इच्छा असलेल्या प्रकल्पांनाही इरादा पत्र देण्यात आले. मराठवाड्यात अधिक गुंतवणूक करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.मागास भागांना संजीवनीलातूर । ६०० कोटींचा रेल्वे डब्यांचा कारखानानांदेड। इंडिया अॅग्रोचे २०० कोटीहिंगोली। शिऊड अॅग्रोटेकचे १२५ कोटीनंदुरबार। जीनस पेपरचा ७०० कोटींचा करारगडचिरोली। ७०० कोटींचा लॉईड एनर्जीचा करारहायपरलूपचा अभ्यास पूर्णहायपरलूपसारखे जगात कुठेही नसलेले नवीन तंत्रज्ञान भारतातच आणले जात आहे. त्याच्या यशाची हमी काय? असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, कंपनीने व्यवहार्यता अभ्यास पूर्ण केला आहे. आता विस्तृत प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. त्यानंतर, १० किमीचा चाचणी घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.‘सहभाग’ पोर्टलविकास मिशनमध्ये सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी ‘सहभाग’ पोर्टल सुरू करण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकारी प्रिया खान व निधी कामदार यांनी या पोर्टलची रचना केली आहे.
३८.८३ लाख नोक-या!, राज्य सरकारचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:12 AM