अलिबाग : करिअरचा टर्निंग पॉर्इंट ठरणाऱ्या १२ वीच्या परीक्षा मंगळवार, २८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. रायगड जिल्ह्यातील ३९ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. ३४ हजार ९८७ परीक्षार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहेत. कॉपीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१७ या कालावधीमध्ये १२ वीच्या परीक्षा पार पडणार आहेत, तर ७ मार्च ते १ एप्रिल २०१७ या कालावधीत दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. पूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षांचा विद्यार्थ्यांसह पालकांवर प्रचंड ताण यायचा मात्र आता तो विशेष करून दिसून येत नाही. अलिबाग को.ए.सो. जे.एस.एम महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी आपापली बैठक व्यवस्था कोठे आहे हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. शाळा व्यवस्थापनांनी आपापल्या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये आसन व्यवस्था केलेली आहे. तेथील बैठक क्रमांक दुपारपर्यंत टाकून झाले होते. रायगड जिल्ह्यामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी तब्बल ३४ हजार ९८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विज्ञान शाखेचे ११ हजार ४७९, कला शाखेचे १० हजार १७, वाणिज्य शाखेचे १२ हजार ४१० आणि एमसीव्हीसीच्या ९८१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये महिला भरारी पथकाचा प्रामुख्याने समावेश केला आहे. पथकामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सहा भरारी पथके संपूर्ण जिल्ह्यातील ३९ परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये १५ परिरक्षण केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. फक्त तळा तालुक्यामध्ये एकही परिरक्षण केंद्र स्थापण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)>मुरुडमधील ९४८ विद्यार्थी देणार परीक्षाआगरदांडा : बारावीची परीक्षा मंगळवारी सुरू होणार आहे. मुरु ड तालुक्यातील एकूण ९४८ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. मुरु ड येथील सर एस.ए. हायस्कूलमधून ६७० विद्यार्थी तर मुरु ड अंजुमन इस्लाम हायस्कू लमधून १९४ विद्यार्थी, नांदगाव येथील छत्रपती नूतन यशवंत नगर कनिष्ठ विद्यालयातून ८४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून मुरु ड शहरातील सर एस.ए. हायस्कू लव अंजुमन इस्लाम हायस्कू लया केंद्रामध्ये या परीक्षा होणार आहेत. या सर्व शाळांची पूर्ण तयारी झाली आहे, असे यावेळी सर एस.ए. हायस्कूलचे मुख्याध्यापक थोरवे यांनी सांगितले, तसेच या परीक्षा १८ मार्चपर्यंत असणार आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये महिला भरारी पथकाचा प्रामुख्याने समावेश केला आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात ३९ केंद्रे
By admin | Published: February 28, 2017 2:44 AM