मुंबई : नापिकी आणि कजर्बाजारीपणाला कंटाळून विदर्भात चार शेतक:यांनी मृत्युला कवटाळल़े बुलडाणा जिलत दोन, तर अमरावती जिलतील चांदूर बाजार आणि यवतमाळच्या घारफळ येथे प्रत्येकी एका शेतक:याने आत्महत्या केली़
चांदूर बाजार तालुक्यातील माधान येथील नामदेव आकाराम खंडारे (65) यांनी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. नामदेव खंडारे यांच्याकडे 6क् आर. शेती आहे. लाल्याने आक्रमण केल्याने कपाशी हातची गेली. अशा परिस्थितीत सोसायटीचे 1 लाख रूपये कर्ज कसे फेडावे? या विवंचनेत ते होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली़त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले 2 विवाहित मुली असा मोठा आप्तपरिवार आहे.
यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्याच्या घारफळ येथील हंसराज उकंडराव भगत (35) या शेतक:याने पाचखेड शिवारातील शेतात विषारी द्रव सेवन केल़े ही बाब लक्षात येताच रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई-वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. या शेतक:याकडे साडे नऊ एकर शेती असून, त्यावर विदर्भ क्षेत्रीय कोकण ग्रामीण बँकेचे 75 हजार 5क्1 रुपये कर्ज आहे.
बुलडाणा जिलतील लोणार येथे उमाशंकर विश्वनाथआप्पा काटकर (46) आणि चांडोळ येथे वामन संपत राऊत (58) यांनी शनिवारी आत्महत्या केली़ उमाशंकर काटकर हे अल्पभूधारक शेतकरी असून, यावर्षी खरीप हंगामात त्यांना मोठी झळ सोसावी लागली. तसेच त्यांच्यावर बँकेचे 3क् ते 4क् हजार रुपये कर्ज होते. ते आर्थिक संकटात सापडले होते आणि त्यातूनच त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. वामन संपत राऊत यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती होती. यावर्षी त्यांनी सोयाबीन पेरले होते. पावसाअभावी सोयाबीनचे पीक आले नाही. त्यांच्यावर सोसायटीचे 2क् हजारांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 3 मुली, पत्नी असा परिवार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)