अहमदनगर : राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली धरणे पूर्ण करण्यासाठी ३० ते ४० हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी येथे सांगितले.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीस पालकमंत्री राम शिंदे, गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक पी़ ए़ बिराजदार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राम घाटे, जिल्हाधिकारी अनिल कवडे आदी उपस्थित होते़जलसंपदा विभागाच्या ५० हजार कोटींच्या प्रकल्पांना मागील काळात मंजुरी देऊन आगाऊ रक्कम अदा करण्यात आली, मात्र प्रकल्प पूर्ण झाले नाहीत़ नियोजनात गडबड झाली़ त्यामुळे वर्षानुवर्षे प्रकल्प कागदावरच राहिले़ शेतकऱ्यांना फायदा झाला नाही़ प्रकल्प अधर्वट राहिले़ त्यातील अनेक प्रकल्पांच्या चौकशा सुरू आहेत़ चौकशांच्या फेऱ्यात विभाग अडकल्याने सुधारित प्रकल्पांना मंजुरी देताना तांत्रिक अडचणी येत आहेत़ त्यांनी घोटाळे केले, ते परिणाम ते भोगत आहेत, असा आरोप महाजन यांनी आघाडी सरकारवर केला़ (प्रतिनिधी)
अर्धवट प्रकल्पांसाठी ४० हजार कोटींचे कर्ज
By admin | Published: March 03, 2016 4:45 AM