सोने २७ हजाराच्या आत : बाजारात निरुत्साहनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात शुद्ध किलो चांदी ४० हजारावर पोहोचली. चार वर्षांतील सर्वाधिक घसरण असून शनिवारी भाव एक हजार रुपयांनी कमी झाले. चांदीचे भाव नोव्हेंबर २०१० मध्ये ४० हजारांवर होते. डिसेंबर २०१३ नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली. तसेच दागिने तयार करण्यासाठी आवश्यक असलेले २२ कॅरेट सोन्याचे भाव पहिल्यांदाच २६,९३५ रुपयांवर स्थिरावले. पितृपक्षात दोन्ही मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी ग्राहक नसल्याने बाजारात निरुत्साह असल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात सोन्याचे भाव तोळ्यामागे ११०० रुपयांनी कमी झाले तर चांदी तब्बल २७०० रुपयांनी उतरली. याशिवाय गेल्या आठवड्यात सोने ३७५ रुपये तर चांदीत २७०० रुपयांची घसरण झाली. जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक बाजारपेठेत खरेदीदार नसल्याने सोन्याच्या मागणीत घट झाली असून बाजारात निरुत्साह आहे. पितृपक्षात सोन्याची खरेदी जवळपास बंद असून बुकिंग सुरू असल्याचे सराफांनी सांगितले.आठवड्यात ३७५ रु.ची घसरणगेल्या आठवड्यात दोन दिवस वगळता चार दिवस सोन्याच्या भावात घसरण झाली. संपूर्ण आठवड्यात सोन्याचे भाव तोळ्यामागे ३७५ रुपयांनी उतरून २७,१८५ रुपयांवर स्थिरावले. स्थानिक सराफा बाजारात सोमवारी शुद्ध सोने ६० रुपयांची वधारले. मंगळवारी पुन्हा ४० रुपयांची घसरण होऊन भावपातळी २७,६०० रुपयांवर स्थिरावली. आंतरराष्ट्रीय घडामोडीनुसार बुधवारी सोने ५० रुपयांनी घसरले. सोन्यात सुरू असलेली घसरण गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी सुरूच होती. यादिवशी शुद्ध सोने २२५ रुपयांनी उतरले. शुक्रवारीसुद्धा भाव ९० रुपयांनी कमी होऊन २७,२६५ रुपयांत विक्री झाली. शनिवारी बाजार बंद होतेवेळी सोन्याचे भाव ८० रुपयांनी उतरले. त्यादिवशी २४ कॅरेट सोने २७,१८५ रुपये, २३ कॅरेट २६,९३५ आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव २६,६८५ रुपयांपर्यंत खाली आहे. वर्षभरापूर्वी शुद्ध सोने २६,६०० रुपयांपर्यंत खाली उतरले होते. त्यावेळी ग्राहकांना दिलासा मिळाला होता. या पातळीपर्यंत सोने खाली उतरेल, अशी ग्राहकांना अपेक्षा आहे. ग्राहकांना खरेदी करता येईल, एवढी पातळी सोन्याने ओलांडली आहे. याशिवाय शुद्ध चांदी किलोमागे १५०० रुपयांनी कमी होऊन भाव ४०,७०० रुपयांवर पोहोचले. पुढील आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात घट होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. पितृपक्षामुळे ग्राहकांनी खरेदी थांबविल्याचे सराफांनी सांगितले. (प्रतिनिधी)दोन शहरात ६८५ रु.ची तफावत!नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमध्ये सोन्याच्या भावात प्रचंड तफावत आहे. शनिवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या भावात ६८५ रुपयांचा फरक होता. नागपुरात २७,१८५ रुपये तर मुंबईत २६,५०० रुपये भाव होता. फरकामुळे ग्राहकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. संपूर्ण देशात एकाच भाव असावा, असा ग्राहकांचा आग्रह असतो. दोन शहरातील भावांमध्ये तफावत नेहमीच असते, ही बाब सत्य असली तरीही इतवारी बाजारात प्रत्येक दुकानात भाव वेगवेगळे असतात, हेसुद्धा तेवढेच खरे. सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनुसार बाजारात भाव एकसमान ठेवणे आमच्या हातात नाही. वायदा बाजारामुळे भाव कमी-जास्त होत असतात.
चांदी ४० हजारांवर!
By admin | Published: September 22, 2014 12:55 AM