शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

४० वर्षांत पाप साठल्याने लोकांच्या नशिबी रांगा - मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2016 3:00 AM

बेनामी संपत्तीला आळा घालणारा कायदा संसदेने मंजूर करूनही मागील सरकारने तो अडवून ठेवला. त्यामुळे बेनामी संपत्तीचे पाप वाढत गेले. हे पाप रोखण्यासाठीच कठोर पावले

पुणे : बेनामी संपत्तीला आळा घालणारा कायदा संसदेने मंजूर करूनही मागील सरकारने तो अडवून ठेवला. त्यामुळे बेनामी संपत्तीचे पाप वाढत गेले. हे पाप रोखण्यासाठीच कठोर पावले उचलली आहेत. गेल्या ४० वर्षांत देशातील रोगांवर वेळीच इलाज झाला असता तर १२५ कोटी जनतेला आज रांगेत उभे राहावे लागले नसते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. पुण्याच्या बहुचर्चित मेट्रोचे भूमिपूजन केल्यानंतर मोदी बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव पाटील, सुप्रिया सुळे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे उपस्थित होते़ मोदी म्हणाले, ‘‘नोटाबंदीनंतर ज्यांनी बॅँकेत पैसे टाकून काळ्याचे पांढरे केले त्यांनी खूश होण्याचे कारण नाही. कारण त्यांचा पैसा नाही, तर चेहरा काळा झाला आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. पूर्वी पैसे नव्हते, आता कोठून आले हे विचारले जाणार आहे. या बेइमानांनी आता तरी सांभाळावे. अजूनही संधी आहे. चांगल्या रस्त्यावर या. गरिबांच्या हक्काचे पैसे त्यांना परत द्या. नाहीतर वाचण्याची संधी मिळणार नाही. आयुष्यभर त्यांना सुखाची झोप मिळू नये यासाठी मीसुद्धा झोपणार नाही.’’ नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्यांना जितक्या वेदना झाल्या, तितक्याच मला झाल्या, असेही त्यांनी सांगितले. मागच्या सरकारांनी खूप कामे माझ्यासाठी बाकी ठेवल्याने चांगली कामे करण्याची संधी मला मिळाली असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘‘तत्कालिक राजकीय फायद्याचा विचार न करता भविष्यवेधी विचार करून समस्यांवर उत्तर शोधण्यात येईल. देशात सर्वत्र वेगाने शहरीकरण होत असून त्यासाठी दोन पातळ्यांवर उपाययोजनांची तयारी आमच्या सरकारने केली आहे. शहराकडील ही धाव कमी करण्यासाठी गावांमध्येच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच जीवनमानाचा दर्जा सुधारला जाईल. पुढच्या २५ ते ३० वर्षांचा विचार करून विकासकामे केली जातील.हायवे आणि आयवेदेशभरातील अडीच लाख पंचायती आॅप्टिकल फायबरने जोडण्याचे काम सुरु केले आहे़ डिजिटल इंडियामध्ये संपूर्ण देशाला जोडण्याचे काम आहे़ एक काळ असा होता की, लोकांना पायाभूत सुविधामध्ये पाणी, रोड, रेल्वे, विमानतळ यांचा समावेश होता़ आता हायवे पाहिजे, त्याबरोबर आयवेही (आॅप्टिकल फायबर) पाहिजे आहे़डबल इंजिनची ताकदगेल्या १५ वर्षात महाराष्ट्राची गाडी खड्ड्यात फसली आहे़ तिला बाहेर काढण्यासाठी डबल इंजिनची ताकद पाहिजे़, असे मी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच सांगितले होते. केंद्र आणि राज्य सरकार अशी डबल इंजिनची ताकद राज्यातील जनतेने दिल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले़ पवारांना भाषणाची संधी नाहीचपुणे मेट्राच्या भूमिपूजन समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना व्यासपीठावर स्थान मिळावे यासाठी महापौर प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जंगजंग पछाडले़ त्यासाठी काँग्रेसला बरोबर घेऊन महापालिकेत पवार यांच्या हस्ते भूमिपूजनाचा ठरावही संमत करुन घेतला़ शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर शरद पवार यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले़ मात्र, त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. उलट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी गेल्या १५ वर्षांतील सरकारांचे पवारांसमोर वाभाडे काढले.