शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

एक्साईजमध्ये उपनिरीक्षकांच्या ४०० जागांची भरती

By admin | Published: November 17, 2016 4:39 PM

राज्य उत्पादन शुल्क खात्यातील रिक्त पदांची पोकळी भरुन काढण्यासाठी उपनिरीक्षकांच्या तब्बल ४०० जागांची भरती घेतली जाणार आहे.

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 17 : राज्य उत्पादन शुल्क खात्यातील रिक्त पदांची पोकळी भरुन काढण्यासाठी उपनिरीक्षकांच्या तब्बल ४०० जागांची भरती घेतली जाणार आहे. यासंबंधी मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. एक्साईजमध्ये यापूर्वी १९७९ ला राज्य लोकसेवा आयोगामार्फत उपनिरीक्षक पदाची थेट भरती घेण्यात आली होती. त्यानंतर या पदाची मोठ्या संख्येने भरती घेतली गेली नाही. मध्यंतरी १९९८ मध्ये प्रकल्पग्रस्त व तत्स्म उमेदवारांकरिता उपनिरीक्षकाच्या केवळ ४८ जागांची भरती घेण्यात आली होती. आता ४०० पदांच्या होऊ घातलेल्या भरतीकडे एक्साईजमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पाल्य तसेच सुशिक्षित बेरोजगारांच्या नजरा लागल्या आहेत.

एक्साईजला सध्या नागपूर येथे उपायुक्ताचे पद आहे. मात्र या अधिकाऱ्याकडे तब्बल ११ जिल्ह्यांची जबाबदारी येत असल्याने प्रशासन सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. ही बाब ओळखून अमरावतीला पाच जिल्ह्यांसाठी स्वतंत्र उपायुक्तांचे पद मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. एक्साईज आयुक्तालय या पद मंजुरीसाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते.

एक्साईजच्या वाहनांना जीपीआरएसएक्साईजची वाहने नेमकी कुठे जातात याचा सध्या थांगपत्ता लागत नाही. म्हणून लवकरच या वाहनांना जीपीआरएस लावले जाणार आहे.

महसुली टार्गेटपर्तीबाबत साशंकता अवैध दारू बंद करणे आणि परवानाधारकांकडून वेळेत, नियमानुसारच विक्रीवर भर दिला जात असल्याने १५ हजार कोटींचे वार्षिक महसुलाचे उद्दीष्ट पूर्ण होणार की नाही याबाबत यंत्रणेत साशंकता व्यक्त केली जात आहे. ताडी बंदीमुळे ६५ कोटींच्या महसुलाचे आधीच नुकसान झाले आहे. 

प्रतिबंधित जिल्ह्यांसाठी मिशनवर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या प्रतिबंधित जिल्ह्यांमध्ये दारू पुरवठ्यावर पूर्णत: चाप बसविण्याचे मिशन हाती घेण्यात आले आहे. विशेषत: या तीनही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून होणाऱ्या चोरट्या दारू पुरवठ्यावर आंतरजिल्हा पथकांची खास नजर राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणीसह चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून वर्धा व चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित दारू पाठविली जाते. त्याला चाप बसविण्याचे आव्हान राहणार आहे.