नाशिक : शहराजवळील मातोरी गावातील सुमारे ४०० लोकांना दूषित पाणीपुरवठ्यामुळे अतिसाराची लागण झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़ लोकांना जुलाब, उलट्या व चक्कर येऊ लागल्याने गावात एकच घबराट उडाली. अतिसारामुळे अत्यवस्थ झालेल्या २६ रुग्णांना गिरणारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.२५० रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे़ तर १०० जणांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत़ मातोरी ग्रामपंचायतीमार्फत गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो़ आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारीकडे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामसेवकाने दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले़ तसेच औषधांचा साठा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या़ आनंदवलीजवळील नवश्या गणपतीजवळील विहिरीतील पाणी पाइपलाइनद्वारे गावातील टाकीमध्ये टाकले जाते़
दूषित पाण्यामुळे ४०० गावकऱ्यांना जुलाब, उलट्या!
By admin | Published: May 28, 2016 4:41 AM