शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

१८ लाख आदिवासींना प्रत्येकी चार हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 6:03 AM

आदिवासींना आतापर्यंत उदरनिवार्हासाठी खावटी कर्ज दिले जात होते. वषार्नुवर्षांची ही पद्धत मोडीत काढण्यात येणार आहे.

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाउनच्या काळात कमालीच्या संकटात सापडलेल्या गोरगरीब आदिवासी बांधवांना मोठा दिलासा देणारा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्यातील १८ लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी चार हजार रूपयांची मदत देण्याचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने तयार केला आहे.

आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी लोकमतला सोमवारी ही माहिती दिली. १८ लाख आदिवासी कुटुंबांना तीन हजार रुपयांचा शिधा देण्यात येईल. त्यांना वेगवेगळ्या योजनांमधून तांदूळ, गहू याआधीच मिळत आहे. या व्यतिरिक्त डाळी, चहापत्ती, तेलासह ३ हजार रुपये किमतीच्या सोळा प्रकारच्या वस्तू आदिवासींना देण्यात येतील. तसेच प्रत्येक कुटुंबातील महिलेच्या नावे एक हजार रुपये देण्यात येतील. हे एक हजार रुपये बँकेत टाकण्याऐवजी टपाल कार्यालयातून देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी एकूण ७२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

आदिवासींना आतापर्यंत उदरनिवार्हासाठी खावटी कर्ज दिले जात होते. वषार्नुवर्षांची ही पद्धत मोडीत काढण्यात येणार आहे. खावटी कर्ज द्यायचे मग आदिवासी त्याची परतफेड करू शकत नाहीत म्हणून माफ करायचे, असे दरवर्षी चालते. त्याऐवजी कोरोनाचा संकटकाळ लक्षात घेऊन प्रत्येकी चार हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे.आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा ‘तो’ दावा फोलच्इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शाळांमध्ये दरवर्षी २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला, असा दावा देवेंद्र फडणवीस सरकारने सातत्याने केला होता. आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्या दाव्यातील हवा काढली. २०१५-१६ मध्ये १३,४७४, २०१६-१७ मध्ये १६,४६३, २०१८-१९ मध्ये २,८३९, २०१९-२० मध्ये ४,२७३ विद्यार्थ्यांनाच असा प्रवेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.च्यंदा ही योजना काही काळासाठी थांबविण्यात आली आहे. कारण राज्य शासनाने ३३ टक्के खर्चाचे बंधन टाकले आहे आणि विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा तर संस्थाचालकांना त्यापोटी ११० कोटी रुपये द्यावे लागतील. म्हणून काही महिन्यांसाठी ही योजना थांबवण्यात आली आहे. बंद केलेली नाही.च्राज्याची परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात येईल. इंग्रजी माध्यमाच्या या नवीन शाळा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहेत, त्यात तीन हजार विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश मिळणार आहेत, असे पाडवी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना