औरंगाबाद : मराठवाड्यातील पशुधनाला जून २०१९ पर्यंत ६०० छावण्यांतून चारा पुरवठा करावा लागेल. त्यासाठी अंदाजे ४१४ कोटी २७ लाख १६ हजार रुपयांचा खर्च विभागीय प्रशासनाने अपेक्षित धरला आहे. प्रशासनाने अहवाल तयार केला आहे.विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता आहे. जानेवारीपर्यंत चारा पुरेल अशी स्थिती आहे. मराठवाड्यात दिवसाला २६ हजार ३३० मेट्रिक टन चारा लागतो. सध्या अंदाजे ५ कोटी ७४ लाख मेट्रिक टन चारा आहे. जानेवारीत ११० छावण्या, फेबु्रवारीत १६१, मार्चमध्ये ३१०, एप्रिलमध्ये ४७४, मे महिन्यात ६०० चारा छावण्या सुरू कराव्या लागतील. जूनमध्ये ५६९ छावण्यांना चारा द्यावा लागेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.जिल्हानिहाय पशुधनजिल्हा पशुधनऔरंगाबाद १० लाख ६७ हजार ४१२जालना ६ लाख ९९ हजार २४परभणी ६ लाख २२ हजार २००बीड १२ लाख २४ हजार ७९८लातूर ७ लाख ५२ हजार ४२६उस्मानाबाद ७ लाख ३७ हजार ३४७नांदेड ११ लाख ४४ हजार ७२५हिंगोली ४ लाख ५९ हजार ६८०एकूण ६७ लाख ६१२
मराठवाड्यात चाऱ्यासाठी ४१४ कोटींची आवश्यकता; जून २०१९ पर्यंत ६०० चारा छावण्यांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 4:15 AM