शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

राज्यातील ४२ पोलिसांना राष्ट्रपती पदक

By admin | Published: January 25, 2017 4:02 AM

देशभरातील सुरक्षा दलांत विशेष कर्तृत्व गाजविणाऱ्या जवान आणि अधिकाऱ्यांना प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून दरवर्षी राष्ट्रपती पदकांनी गौरविण्यात येते.

मुंबई : देशभरातील सुरक्षा दलांत विशेष कर्तृत्व गाजविणाऱ्या जवान आणि अधिकाऱ्यांना प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून दरवर्षी राष्ट्रपती पदकांनी गौरविण्यात येते. यंदा देशभरातील ५९७ जणांची या पदकांसाठी निवड करण्यात आली असून त्यात राज्यातील ४२ पोलिसांचा समावेश आहे. तसेच सीबीआय, बीएसएफ, सीआयएसएफ आदी केंद्रीय आस्थापनांमध्ये महाराष्ट्र विभागात कार्यरत असणाऱ्या सहा जणांनाही या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. मंगळवारी या पदकांची घोषणा करण्यात आली. यात निवड झालेल्या राज्यभरातील ४२ पैकी पोलिसांपैकी २९ जण मुंबई-पुण्यातील आहेत. तसेच ४२ पैकी ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी, तर तिघांना उल्लेखनीय सेवेसाठी गौरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मुंबई पोलीस दलातील १० पोलिसांना राष्ट्रपती पुरस्कारप्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणारे राष्ट्रपती पुरस्कार मंगळवारी जाहिर करण्यात आले आहेत. यात राज्यातील ३८ पोलिसांपैकी मुंबईतील १३ जण आहेत. त्यात मुंबई पोलीस दलातील दहा पोलिसांचा समावेश आहे. पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. त्याच्यातल्याच काहींच्या कामगिरीचा लेखाजोखा...संजय सुर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ताडदेव ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक असलेले संजय सुर्वे यांनी बीए एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानतर १९९० मध्ये ते पोलीस दलात दाखल झाले. सुरुवातीला विक्रीकर विभागासह मंत्रालयात काम केले. त्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये रुजु झाले. त्यानंतर एअरपोर्ट, सीएसपीओ, चेंबुर, वांद्रे, वाशी पोलीस ठाण्यासह एटीएस, मुंबई गुन्हे शाखेत यशस्वी कामगिरी केली आहे. यशवंत नामदेव व्हटकर, उपमहानिरीक्षकमुळचे कोल्हापुरचे रहिवासी असलेले व्हटकर १९८३ मध्ये मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले होते. तिहेरी बॉम्ब स्फोटासह महत्त्वाच्या तसेच संवेदनशील गुन्ह्यातील त्यांच्या यशस्वी कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच मुंबईतील तिहेरी बॉम्ब स्फोटासह विविध महत्त्वाच्या गुन्ह्यांतील तपासात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यपत्र दक्षताचे सरसंपादक आहेत. त्यांना पोलीस महासंचालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सुखलाल वर्पे, वरीष्ठ पोलीस निरिक्षक एमआरए मार्ग पोलीस ठाणे१९९३ बॉम्ब ब्लास्ट, जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्ट, रेल्वे ब्लास्ट यामध्ये वर्पे यांनी यशस्वी कामगिरी बजावली. रमेश मोरे,बीजेपी आमदार रामदास नाईक, राजेंद्र गुप्ता यांच्या महत्त्वपूर्ण तसेच संवेदनशील अशा हत्येचा उलगडा त्यांच्या काळात करण्यात आला आहे. वर्पे यांनी १९८९मध्ये दादर पोलीस ठाण्यांपासून पोलीस दलात कामकाज केले. त्यांना पोलीस महासंचालक पुरस्काराने गौरविले. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदके (पोलीस) : शांतिलाल अरुण भामरे, पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा, मुंबई, यशवंत नामदेव वटकर, साहाय्यक पोलीस महानिरीक्षक, मुंबई, संजय शामराव निकम, पोलीस उपाधीक्ष, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, मुंबई, संजय गणपत सुर्वे, निरीक्षक, गुन्हे विभाग, मुंबई, सुखलाल आनंद वार्पे, निरीक्षक, मुंबई प्रकाश मनोहर नलावडे, साहा. पोलीस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई. विजय राजाराम आंबेकर, उपनिरीक्षक, चोरी-दरोडे प्रतिबंधक कक्ष, कुर्ला, मुंबई, हनुमंत तुळसकर, सहा. उपनिरीक्षक, एसआरपीएफ मुंबई, राजेंद्र कारंडे, हेड काँस्टेबल, वर्सोवा पोलीस ठाणे, मुंबई. अशोक आनंदराव हुंबे, हेड काँस्टेबल, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई शहर., जयप्रकाश जगन्नाथ माने, गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई, चंद्रकांत पारबती शिंदे, हेड काँस्टेबल, सशस्त्र पोलीस, ताडदेव, मुंबई, जयवंत चंद्रकांत संकपाळ, हेड काँस्टेबल, गुन्हे शाख, सीआयडी मुंबई शहर, राजीव विष्णु जाधव, हेड काँस्टेबल, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई शहर, रमेश महादेव जाधव, हेड काँस्टेबल, पोलीस नियंत्रण कक्ष, ठाणे शहर, अभय शामसुंदर कुरुंदकर, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण.सुनील वामनराव खरडकर, साहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर, विजयसिंग रामकृष्ण गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे शहर, सीमा दीपक मेहेंदळे, निरीक्षक, पोलीस नियंत्रण कक्ष, पुणे शहर, संजय भाऊसाहेब नाईक पाटील, निरीक्षक, विमानतळ पोलीस ठाणे, पुणे शहर, बबनराव बाळासाहेब भोर, उपनिरीक्षक, पोलीस आयुक्तालय, पुणे शहर, पुनाजी पांडुरंग डोईजड, साहा. उपनिरीक्षक, मुख्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज पुणे.अशोक शिवराम झगडे, साहा. उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे, अरुण आत्माराम पोटे, साहा.उपनिरीक्षक, मुख्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज पुणे, विलास कोंडिबा घोघरे, हेड काँस्टेबल, सहकार नगर पोलीस ठाणे, पुणे शहर, बलवंत दत्तात्रेय यादव, हेड काँस्टेबल, समर्थ पोलीस ठाणे, पुणे शहर, अशोक बजरंग कांबळे, हेड काँस्टेबल, विशेष शाखा, पुणे शहर.फसिउद्दीन मोईनुद्दीन खान, निरीक्षक, एमटी विभाग, औरंगाबाद शहर, श्रीकांत चंद्रकांत उबाळे, साहा. पोलीस काँस्टेबल, विशेष कृती दल, बीड, अशोक बाबूराव गायकवाड, साहा. उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, लातूर, विद्याधर रंगनाथ टेकले, साहा. उपनिरीक्षक, सीआरओ, लातूर, जगन्नाथ देविदास सुर्यवंशी, साहा. उपनिरीक्षक, डीएसबी, लातूर, कल्याण महादेव घोडके, साहा. उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, एमटी विभाग बीड.अन्यमहादेव भीमराव तांबडे, पोलीस अधीक्षक, सीआयडी- आर्थिक गुन्हे विभाग, महाराष्ट्रअजीनाथ दत्तात्रेय वाक्से, साहा. उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, महाराष्ट्रउल्लेखनीय सेवेसाठी पदके (पोलीस)व्ही. व्ही. लक्ष्मी नारायण, अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुंबई, महाराष्ट्र, महादेव श्रीपती गावडे, उपाधिक्षक, चिपळूण विभाग, रत्नागिरी, शिवाप्पा इराप्पा मोर्ती, साहा. पोलीस उपनिरीक्षक, हातकणंगले पोलीस ठाणे, कोल्हापूर.रायगडसवता महादेव शिंदे, निरीक्षक, रायगड, मोहन पोशा मोरे, हेड काँस्टेबल, सायबर कक्ष, गुन्हे शाखा रायगड, पांडुरंग शंकर खेडेकर, हेड काँस्टेबल, एमआयडीसी पोलीस ठाणे रायगड.