मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत आतापर्यंतची सर्वाधिक मोठी म्हणजे ४ हजार २७५ घरांची लॉटरी फेब्रुवारीमध्ये काढण्यात येणार आहे. अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या अनामत रकमेमध्ये यंदा कपात करण्यात आली असून, घरांच्या किमती कमी करून म्हाडाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.म्हाडाने गत लॉटरीवेळी कोकण मंडळाची लॉटरी जानेवारी माहिन्यात काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एक महिना विलंबाने का होईना अखेर म्हाडाने कोकण मंडळाच्या लॉटरीची घोषणा केली आहे. या लॉटरीत विरार येथील ३ हजार ७५५ घरांचा समावेश आहे. तर बाळकुम-ठाणे येथील १९, मीरा रोड येथील ३१0, कावेसर-ठाणे येथील १६४ व वेंगुर्ला येथील २७ घरांचा समावेश आहे. यामध्ये ३२९ अत्यल्प उत्पन्न गट, २ हजार ६२९ अल्प उत्पन्न गट, १ हजार ३११ मध्यम उत्पन्न गट व ६ उच्च उत्पन्न गटाच्या सदनिकांचा समावेश असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी सोमवारी म्हाडा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.लॉटरीतील सदनिकांच्या विक्रीसाठीची जाहिरात मंगळवार, १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे; तर आॅनलाइन नोंदणी १३ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार आहे. आॅनलाइन अर्ज १५ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत करता येईल. त्याचप्रमाणे आॅनलाइन पेमेंट ९ फेब्रुवारीपर्यंत करता येणार असून, डी डी / पे आॅर्डर भरण्याची अंतिम मुदत ११ फेब्रुवारीपर्यंत आहे. अर्जदारांची तात्पुरती यादी १६ आणि अंतिम यादी १९ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी रंगशारदा नाट्यमंदिर वांद्रे येथे संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.अर्जासोबत भरावयाच्या अनामत रकमेमध्ये यंदा म्हाडाने कपात केली आहे. यापूर्वी अत्यल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करणाऱ्यांना १0 हजार रुपये रक्कम भरावी लागत होती. यंदा यामध्ये कपात केली असून, ही रक्कम ५ हजार करण्यात आली आहे. अल्प उत्पन्न गटासाठी १0 हजार, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार आणि उच्च उत्पन्न गटासाठी २0 हजार रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे.तर किमतींमध्येही यंदा कपात करण्यात आली आहे. विरार येथील अल्प उत्पन्न गटासाठी २२ लाख ६४ हजार ६९५ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. २0१४च्या तुलनेत किमतीमध्ये २ लाख ६ हजार ८९0 रुपयांची कपात करण्यातआली आहे. तर मध्यम उत्पन्नगटाच्या किमतीमध्ये ६ लाख ४९ हजार १६५ रुपयांची कपात करण्यातआली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे.२0१४च्या घरांच्या किमतीही कमीकोकण मंडळाने २0१४मध्ये अल्प उत्पन्न गटातील १ हजार ११६ आणि मध्यम उत्पन्न गटातील ६00 सदनिकांची सोडत काढली होती. या वेळी म्हाडाने अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत २६,१९,९0९ रुपये निश्चित करण्यात आली होती. तर मध्यम उत्पन्न गटातील घराची किंमत ५0 लाख २१ हजार ६१४ रुपये जाहीर केली होती. या लॉटरीतील घरांच्या किमतीही म्हाडाने कमी केल्या असून, अल्प उत्पन्न गटातील विजेत्यांना २२ लाख ६४ हजार ६९५ आणि मध्यम उत्पन्न गटातील घराची किंमत ६ लाख ४९ हजार १६५ रुपयांनी कमी केली आहे. या निर्णयामुळे २0१४च्या सोडतीतील विजेत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.ठाण्यात ४ लाख ३७ हजार ४१८ रुपयांना घरकोकण मंडळाच्या फेब्रुवारी महिन्यात काढण्यात येणाऱ्या लॉटरीमध्ये ठाणे, बाळकुम येथील अत्यल्प उत्पन्न गटातील घर ४ लाख ३७ हजार ४१८ रुपयांना मिळणार आहे. या घराचे क्षेत्रफळ १९.२६ चौरस मीटर आहे; तर २५.0५ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या घराची किंमत ५ लाख ५८ हजार २१३ रुपये आहे.अर्जाची किंमत३00 रुपयेकोकण मंडळाच्या लॉटरीत अर्ज भरणाऱ्या अर्जदारांना अर्ज करण्यासाठी ३00 रुपये मोजावे लागणार आहेत.मुंबई मंडळाची लॉटरी मे महिन्यातमुंबई : म्हाडाने कोकण मंडळाची लॉटरी फेब्रुवारी महिन्यात काढण्याचे जाहीर केले असले तरी मुंबई मंडळाची लॉटरी मे महिन्यातच काढण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिली. या लॉटरीमध्ये १ हजार ७00 ते ८00 घरांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
म्हाडाची २४ फेब्रुवारीला ४,२७५ घरांची लॉटरी
By admin | Published: January 12, 2016 4:35 AM