- पंकज रोडेकर, ठाणेठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने देहविक्रीविरोधात कारवाई करताना मागील १४ महिन्यांत ४३ बांगलादेशींना अटक केली आहे. यामध्ये १६ बांगलादेशी महिलांचा समावेश आहे. या महिलांना नोकरीचे आमिष दाखवून या व्यवसायात ओढले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात देहविक्री करणाऱ्यांवर अनैतिक मानवी वाहतूक पथकाने कारवाईची करत २०१५ या वर्षात जवळपास ३०-३५ छापे टाकून सुमारे १०० हून अधिक जणांना अटक केली. यामधील ११ कारवायांत ४० बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. यामध्ये १४ महिला आणि २६ पुरुषांचा समावेश आहे. तर, २०१६ या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात केलेल्या एका कारवाईत ३ बांगलादेशींना पकडले आहे. यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथक शकील शेख यांनी सांगितले.या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब बर्गे यांना बांगलादेशी भाषा प्रामुख्याने येत असल्याने बांगलादेशींची ओळख पटत आहे. वास्तव्याची ठिकाणेशहरातील ठाणेनगर, कापूरबावडी, कळवा, मुंब्रा, शीळ-डायघर, डोंबिवली मानपाडा, नारपोली, भिवंडी आणि कोनगाव या पोलीस ठाण्यांच्या परिसरात बांगलादेशी राहतात. यातील दोषींना न्यायालयीन कोठडीत दिली आहे.
देहविक्री व्यवसायात ४३ बांगलादेशींना अटक
By admin | Published: February 21, 2016 1:22 AM