शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

स्वाइन फ्लूचे राज्यात ४३ बळी

By admin | Published: February 13, 2015 1:52 AM

महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २९६ असून आतापर्यंत ४३ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

मुंबई : महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २९६ असून आतापर्यंत ४३ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. शेजारच्या गुजरात राज्यामध्ये स्वाईन फ्लूची लागण मोेठ्या प्रमाणावर झाली असून त्यांना महाराष्ट्रातून औषधे पुरवण्यात येत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.डॉ. सावंत म्हणाले की, स्वाईन फ्ल्यूची साथ महाराष्ट्रात शेजारच्या गुजरातच्या तुलनेत आटोक्यात आहे. बुधवारपर्यंत या साथीने मरण पावणाऱ्यांची संख्या ४० होती. बुधवारी रात्री तीनजण मरण पावल्याने आता मृतांची संख्या ४३ झाली आहे. गुजरातने केलेल्या मागणीनुसार स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांवर उपचार करण्याकरिता २५०० कॅप्सुल्सचा साठा धाडण्यात आला आहे. तेवढ्याच कॅप्सूल्स परत करण्याच्या बोलीवर ही मदत केलेली असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. मुंबईत नवे १० रुग्णमुंबईत स्वाईन फ्ल्यूचे ९० रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी ५७ रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर, ३३ रुग्ण हे मुंबई बाहेरून मुंबईत उपचारांसाठी आले आहेत. गुरूवारी, १२ फेब्रुवारी रोजी भोपाळवरून स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी आलेल्या एका ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मुंबई बाहेरून उपचारासांठी आलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आता ७ वर पोहचला आहे. भोपाळ येथील एका महिलेचा गुरूवारी मुंबईत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. २५ जानेवारी रोजी या महिलेला अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गुरूवार, १२ फेब्रुवारी रोजी मुंबईत स्वाईनचे नवे १० रुग्ण आढळून आले आहेत. यात ५ महिला रुग्णांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी नवीन रुग्णांपैकी सातजणांना रुग्णालयात दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबई बाहेरून ४ रुग्ण उपचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी तीन लहान मुले आहेत. ठाणे येथील ४ वर्षीय मुलला, ५ वर्षीय मुलीला आणि १५ वर्षीय मुलीला स्वाइनची लागण झाली आहे. १५ वर्षीय मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. इतर दोन मुलांना बाह्य रुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. कल्याणच्या ४९ वर्षीय महिलेला पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. (प्रतिनिधी)