जमीर काझी, मुंबईपोलिसांवर गेल्या काही दिवसांपासून होत असलेले हल्ले चर्चेचा विषय बनलेला आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून खाकी वर्दीवाल्यांवरील हल्ल्याचा आलेख राज्यभरात वाढत आहे. २०१२ पासून या वर्षाच्या जुलैअखेरपर्यंत तब्बल चार हजार ३५३ जण कर्तव्य बजावत असताना समाजकंटकाचे ‘टार्गेट’ ठरले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ९४७ गुन्हे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगर मुंबईतील आहेत.साडेचार वर्षांत पोलिसांना झालेल्या मारहाणीपैकी ४,१५३ गुन्ह्यांचा तपास करण्यात यश आले आहे. या प्रकरणी एकूण सहा हजार ८८१ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, दोनशे गुन्ह्यांचा तपास मात्र थंड आहे. त्यातील आरोपींचा शोध घेण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचे गृहविभागाकडे सादर करण्यात आलेल्या एका अहवालातून समोर आले आहे. मुंबई वाहतूक शाखेतील कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा मारहाणीतून मृत्यू झाल्यानंतर, त्याबाबत सर्वस्तरातून तीव्र निषेध उमटत आहे. विरोधकांकडून त्याबाबत कडाडून टीका होत असल्याने, गृहखात्याची धुरा सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांपासून झालेल्या हल्ल्याची आकडेवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मागविली. त्याची एक प्रत ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. राज्यात २०१२ या वर्षात पोलिसांना मारहाणीच्या एकूण ६५१ गुन्हे दाखल होते. त्यापैकी ६३६ गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी १६०० मारेकऱ्यांना अटक केली. २०१३ व १४ मध्ये दाखल गुन्ह्यांचे प्रमाण अनुक्रमे ९२८ व ९९८ इतके तर तपास ८७२ व ९४९ प्रकरणांचा झाला. त्यामध्ये १,५३१ व १,०८१ संशयितांना अटक करण्यात आली. गेल्या वर्षी मारहाणीचे १०८१ गुन्हे दाखल झाले होते, तर १०३६ प्रकरणाचा तपास होऊन १५१३ मारेकऱ्यांना पकडण्यात आले. या वर्षी जुलैअखेरपर्यंत ६९५ घटना घडल्या आहेत. ६६० गुन्ह्यांचा तपास झाला आहे. त्यात १,१५६ जणांना अटक झाली आहे. पोलिसांना मारहाणीचे मुंबईत सर्वाधिक गुन्हे पोलिसांना मारहाणीचे सर्वाधिक गुन्हे मुंबई आयुक्तालयांतर्गत घडले आहेत. गेल्या साडेचार वर्षांत तब्बल ९४७ घटना घडल्या आहेत. यापैकी १०७ गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. या घटनांपैकी पोलिसांनी १,२६८ जणांना अटक केली आहे. या वर्षांच्या ३१ आॅगस्ट अखेरपर्यंत २०७ गुन्हे घडले आहे. १८९ प्रकरणाचा तपास झाला आहे, तर २८६ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई खालोखाल ठाणे, पुणे व नागपूर आयुक्तालयात घटना घडल्या आहेत. परिक्षेत्रात कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद परिक्षेत्र आघाडीवर आहे. ट्रॅफिक पोलिसांवर हल्लेपोलिसांवर झालेल्या हल्ल्यात सर्वाधिक ७० टक्के घटना या वाहतूक पोलिसांविरुद्धच्या आहेत. वाहतुकीच्या नियमाचे पालन न केल्याने वाहनधारकांला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना मारहाण करण्यात आली. त्याशिवाय या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे राजकीय पक्ष, संघटनाशी संबंधित आहेत.
माहिती एकत्र नाहीच !ही आकडेवारी केवळ भादंवि ३५३ कलमान्वये दाखल प्रकरणाची आहे. प्रत्यक्षात मारहाणीत अनेकांचा मृत्यू, जबर जखमी झाल्याने, त्याबाबत त्याच्या स्वरूपानुसार स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्याबाबतची माहिती एकत्रित संकलित नसल्याचे गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पोलीस हल्लाच्या वर्षनिहाय तपशीलवर्षगुन्हेउघडअटक२०१२६५१६३६१६००२०१३९२८८७२१५३१२०१४९९८९४९१०८१२०१५१०८११०३६१५१३जुलै१६६९५६६०११५६एकूण४,३५३४१५३६८८१