मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी देशात लॉकडाऊन करण्यात आला. आता कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानं अनेक ठिकाणी निर्बंध लादले गेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच कोरोना संकट आलं. या कालावधीत सरकारचं काम कसं झालं, सरकारची कामगिरी नागरिकांना कशी वाटली, याबद्दलची एक आकडेवारी समोर आली आहे.भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा १०० दिवसांपर्यंत प्रभाव जाणवणार, तब्बल २५ लाख नवे रुग्ण सापडणार कोरोना काळात ठाकरे सरकारनं परिस्थिती योग्य रितीनं हाताळली का, असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला. त्यावर ४४ टक्के लोकांनी होय, तर ३६ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. तर २० टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं. लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं का, या प्रश्नाला होय असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ४८ टक्के, तर नाही असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ३१ टक्के इतकं आहे. सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण २१ टक्के आहे. एबीपी माझानं याबद्दलचं सर्वेक्षण केलं आहे....तर पुढील २ आठवड्यांत कोरोनामुळे रोज १ हजार जणांचा बळी; महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारामहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या वर्षी कोरोना रुग्ण वाढीनं नोंदवलेला उच्चांक आता मोडीत निघाला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट नेमकी कशामुळे आली, असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला. चुकीच्या हाताळणीमुळे कोरोनाची लाट आल्याचं ३६ टक्के लोकांना वाटतं. तर जास्तीच्या चाचण्यांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं २९ टक्के लोकांना वाटतं. तर ३५ टक्के लोकांनी सांगता येत नसल्याचं म्हटलं.
कोरोना काळात सामान्य जनता जबाबदारीनं वागली का?होय- ४९ टक्केनाही- ३५ टक्केसांगता येत नाही- १६ टक्के
४५ वर्षांवरील प्रत्येकाला लस दिल्यास दुसरी लाट ओसरेल का?होय- ४६नाही- २६सांगता येत नाही- २८ टकके