नेरे : नीरा-देवघर (ता़ भोर) धरणातून दीड महिन्यापूर्वी नदीपात्रात, तर दहा दिवसांपूर्वी डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा उपयोग धरणाच्या खालील पट्ट्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे़ मात्र, सध्या धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून पाणीसाठा ४४ टक्के आहे.नीरा-देवघर धरण भोर तालुक्यासाठी वरदान ठरत असले, तरी नदीपात्रात व कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे़ कालव्याचे अस्तरीकरणाचे काम अर्धवट असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ या कालव्या खालील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळ्याप्रमाणे पाणी साठून राहत आहे़ यामुळे शेतात आलेल्या पिकांची नासाडी होत आहे़ यावर्षी शंभर टक्के धरण भरूनही नियोजनाअभावी फेब्रवारीच्या शेवटच्या आठवड्यातच धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे़ उन्हाळ्याचे अजून तीन महिने बाकी आहेत. मात्र, कालव्यातून गळती होणारे पाणी थांबवले नाही तर ते पाणी वाया जाऊन पुढील काळात पाणी पुरेल की नाही, अशी चिंता शेतकरी व भागातील नागरिकांना लागून राहिली आहे.
नीरा-देवघर धरणात ४४ टक्के पाणीसाठा
By admin | Published: February 27, 2017 12:56 AM