शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

नाशिकमध्ये 44 हजार रुग्णांनी घेतले मोफत उपचार

By admin | Published: June 03, 2016 8:11 PM

एसएमबीटी हॉस्पिटलद्वारा आयोजित उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे आरोग्यशिबीर ठरलेल्या ‘आरोग्यसाधना’ या मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचा तब्बल 43,546 रुग्णांनी

ऑनलाइन लोकमत
इगतपुरी (नाशिक), दि.3 - एसएमबीटी हॉस्पिटलद्वारा आयोजित उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे आरोग्यशिबीर ठरलेल्या ‘आरोग्यसाधना’ या मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचा तब्बल 43,546 रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिराला मिळालेला प्रचंड प्रतिसाद भारावून टाकणारा आहे, यापुढील काळातही रुग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही बांधिल राहू,’ असे एसएमबीटीचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. हर्षल तांबे यांनी सांगितले. 
  उत्तर महाराष्ट्रातील नामवंत एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटलद्वारा 31 मे पर्यंत मोफत आरोग्यसाधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात हृदयरोग, कॅन्सर, मेंदूविकार, आस्थिरोग, किडनीरोग, मधुमेह-उच्च रक्तदाब, स्त्री रोग, लहान मुलांचे आजार, टी.बी.चेस्ट, कान नाक घसा, त्वचारोग, दंतरोग, नेत्ररोग, मानसिक आजार, तसेच जनरल मेडिसीन वर्गातील कावीळ, पोटाचे विकार आदी समस्यांबाबत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत हे उपचार मोफत करण्यात आले. 
एसएमबीटी हॉस्पिटलचा सुसज्ज हृदयरोग विभाग अर्थात एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये शिबिर कालावधीत तब्बल 3134 हृदयरुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यात 534 रुग्णांची अ‍ॅन्जिओग्राफी व अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली तर 154 रुग्णांच्या ओपन हार्ट सर्जरी पार पडल्या. एसएमबीटीच्या हृदयरोग विभागाला वाढता प्रतिसाद हे येथील सर्वोत्तम आरोग्यसुविधांचे द्योतक आहे. या शिबीरात मधुमेह आणि त्यासंदर्भातील तक्रारींवर मोफत निदान करण्यात आले. एसएमबीटी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक बालरोग व शस्त्रक्रीया विभागाचा तब्बल 2500 बालरुग्नांनी लाभ घेतला. एसएमबीटी हॉस्पिटलच्या दर्जेदार स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागात शिबीराच्या काळात 854 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यातील आवश्यकता असलेल्या मातांना मोफत सोनोग्राफी, सिझेरीयन व मोफत ऍम्बुलन्स सारख्या सुविधाही देण्यात आल्या. 
  एसएमबीटी हॉस्पिटलने सुसज्ज व अत्याधिनिक अस्थिरोग विभाग तयार केलेला आहे. निष्णात डॉक्टर्स मुळे त्यात अधिकच भर पडलेली आहे. शिबीर कालावधीत सुमारे 3600 रुग्णांनी या विभागांतर्गत आस्थिरोग, सांधेबदल शस्त्रक्रिया, हाडांचे विकार, सांधेवात आदी समस्यांवर मोफत उपचार करून घेतले. 
कॅन्सर रुग्णांसाठी शिबीर काळात स्वतंत्र कॅन्सर विभागाची निर्मिती करण्यात आली होती, याचा मोठ्याप्रमाणावर गरजू रुग्णांनी लाभ घेतला. एसएमबीटीच्या दंत चिकित्सा विभागातही 2 हजारांहून अधिक रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली. त्यातील निम्म्याहून अधिक रुग्णांना दंतभरन, कृत्रिम दात बसविने आदी सुविधांचाही लाभ झाला. नेत्र चिकित्सा विभागातही 1300 हून अधिक रुग्णांनी मोफत तपासणी करून घेतली. 
  कावीळ, पोटाचे विकार, लिव्हरचे सर्व अजार, थकवा, ऍनेमिया या जनरल मेडिसीन वर्गात मोडणार्‍या उपचारांचा लाभ तब्बल 4 हजारांहून अधिक रुग्णांनी घेतला. या व्यतिरिक्त मानसविकार, नाक कान घशाचे आजार, टी.बी चेस्टच्या समस्या यावरही हजारो रुग्णांनी मोफत तपासनी करून घेतली. हॉस्पिटलचा अत्याधुनिक आणि वैश्‍विक मानांकन सांभाळणारा रेडिओलॉजी विभाग हा उत्तर महाराष्ट्राच्या अरोग्य वर्तुळातील मानाचा तुराच आहे. या विभागाचा सहा हजारांहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
  एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आणि सर्व आधुनिक उपकरनांनी सुसज्ज असा 40 बेडचा अतिदक्षता विभाग आहे. या व्यतिरिक्त 24 तास चालू असलेला 30 बेडचा सुसज्ज अपघात विभाग रुग्णांना चांगली सुविधा देण्यासाठी कायमच सज्ज असतो.  शिबीर कालावधीतही या सर्व अधुनिक सुविधांमुळे रुग्णांवर अचूक निदान करणे शक्य झाले. उत्तम आरोग्य सुविधा मोफत मिळाल्याची भावनाही अनेक रुग्णांनी बोलून दाखविली.
सर्वोत्तम उपचार, मोफत देणे हे एसएमबीटी हॉस्पिटलचे व्रतच आहे.
 
दुर्गम भागात आणि ते देखील आरोग्यक्षेत्रात काम करतांना नक्की अडचणी येतात, मात्र त्यावर मात करत एसएमबीटी हॉस्पिटलने आरोग्यक्षेत्रात सर्वोत्तम मानदंड उभा केला आहे. आरोग्यसाधना शिबीराला मिळालेले प्रचंड यश हा आमच्यावर असलेला रुग्णांचा विश्‍वास आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधांनाच अधोरेखीत करतो. यापुढेही आम्ही मोफत उपचार व शस्त्रक्रिया करतच राहणार आहोत, रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा.
- डॉ. हर्षल तांबे,
व्यवस्थापकीय विश्‍वस्त, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट