मुंबई : राज्यातील ४४ टोल रद्द करण्याची राज्य सरकारने केलेली घोषणा म्हणजे लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केली. ज्या टोलनाक्यांची यापूर्वर्ीच वसूली झाली आहे. ते टोलनाके बंद करण्यात यावेत, सी. पी. जोशी समितीने केलेल्या शिफारशींनुसार सर्व टोलनाके सर्व्हरने जोडण्यात यावेत. जेणेकरुन भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि सामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मोटार गाड्यांनाही टोल मुक्त करण्याची आमची आग्रही मागणी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी टोल मुक्त महाराष्ट्र करण्याची योजना आखली होती. त्यामुळे भुजबळ यांनी टोलनाके रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांचे मित्र मुंडे यांना दिलेली श्रद्धांजली असल्याची राजकीय चर्चा आहे. (प्रतिनिधी)