- स्वप्नील शिंदे सातारा : साडेचारशे किलो कांदा विकून वाहतूक व हमालीचे पैसे दिल्यानंतर साता-यातील एका शेतक-याच्या हाती काहीच शिल्लक राहिले नाही. उलट व्यापा-यालाच खिशातून पाच रुपये देण्याची वेळ आल्याने रामचंद्र जाधव यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले. त्यांनी मोठ्या अपेक्षेने रविवारी पहाटे लवकर उठून सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणला. मात्र दिवसभर त्यांचा कांदा विकला गेला नाही.कांद्याला किलोमागे अवघा एक रुपया दर मिळाल्याने जाधव ढसाढसा रडू लागले. वाहतूक व हमाली वजा करून व्यापाºयाकडून हाती पट्टी आली, तेव्हा व्यापाºयाला आपणच पाच रूपये देणे लागत असल्याचे पाहून तर त्यांचे अवसान पुरते गळाले. मोकळ्या हाताने ते घरी परतले.>विकलेला कांदा : ४४४ किलोमिळालेले पैसे : ३९९.६० रुपयेहमाली : ४४.६० रुपयेमोटार भाडे : ३६० रुपयेएकूण : ४०४.६०
४५० किलो कांदा विकून खर्चही निघाला नाही; शेतकऱ्याला खिशातून द्यावे लागले ५ रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 6:33 AM