नागपूर : पती-पत्नी एकत्रीकरणाच्या धोरणानुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या जातात. परंतु आरक्षणाच्या जागा रिक्त नसल्याने अशी प्रकरणे निकाली निघण्याला विलंब लागत असल्याने ४५०० प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.आंतरजिल्हा बदली ही दोन जिल्हा परिषदांमधील कार्यवाहीची बाब आहे. शासनाच्या धोरणानुसार पती-पत्नी एकत्रीकरणासाठी संबंधित जिल्हा परिषदेत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आंतर जिल्हा बदलीस पात्र होतात. त्यानंतर अशा बदलीचे प्रस्ताव तपासताना संबंधित जिल्ह्यातील शाळांची संख्या, या शाळांतील विद्यार्थी संख्या ,सदर शाळांमध्ये संबंधित शिक्षकाच्या नियुक्ती प्रवर्गाचे पद उपलब्ध असणे आवश्यक असते. तसेच सेवाज्येष्ठता आदी बाबींचा विचार केला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.
शिक्षकांच्या बदलीची ४५०० प्रकरणे प्रलंबित
By admin | Published: December 18, 2015 2:36 AM