ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. १२ - राजापूरच्या माडबन समुद्र किना-यावर सापडलेल्या ४७ फूट महाकाय ब्लू व्हेल माशाला वनविभाग आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीमुळे जीवदान मिळाले. दोन दिवसांपूर्वी स्थानिक मच्छीमारांना हा महाकाय व्हेल मासा जख्मी अवस्थेत समुद्र किना-यावर आढळून आला होता.
स्थानिकांनी ही माहिती संबंधित अधिका-यांना कळवल्यानंतर नाटेचे सेना विभागप्रमुख सुनील राणे व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रविवारी वन विभागाने विशेष मोहिम राबवून वाळूत रुतलेल्या माशाला खोल पाण्यात सोडले.