रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठीच्या १०७ जागांसाठी तब्बल विक्रमी ४७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची शनिवार ही शेवटची मुदत असल्याने सर्वच ठिकाणी उमेदवारांची तुडुंब गर्दी झाली होती. चार नगरपरिषदांमध्ये होणाऱ्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी २५ अर्ज दाखल झाले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगरपरिषदांची आणि दापोली नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच ठिकाणी उमेदवारांची रीघ लागली होती. रत्नागिरीमध्ये नगरसेवकांच्या ३0 जागांसाठी १२0 अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक जागा रत्नागिरी नगरपरिषदेतच असल्याने येथील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. शिवसेना, भाजप स्वबळावर लढत असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. (प्रतिनिधी)>चिपळूणमध्ये सर्व पक्षांची स्वबळावर लढतचिपळूणमध्ये २६ जागांसाठी ११३ अर्ज दाखल झाले आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी ५ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची जास्त गर्दी झाल्यामुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होते. येथे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे चार पक्ष स्वबळावर लढत आहेत. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे यावेळी राष्ट्रवादीतील काही मंडळी शिवसेनेला सहकार्य करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.>सेनेला कडवे आव्हानखेडमध्ये नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवारांनी आणि नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे मनसे आणि राष्ट्रवादीने शहर विकास आघाडी केल्यामुळे शिवसेनेला कडवे आव्हान उभे झाले आहे. भाजप येथेही स्वबळावर लढत आहे. दापोली नगरपंचायतीमध्ये १७ जागांसाठी १0८ अर्ज दाखल झाले आहेत. खेड अणि राजापूरमध्ये अर्जांची संख्या कमी असली तरी दापोलीमध्ये मात्र ही संख्या मोठी आहे.२ नोव्हेंबरला या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. ११ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.>नगरसेवकपदासाठी विक्रमी अर्जनगर परिषदजागाअर्जरत्नागिरी३0१२0चिपळूण२६११३खेड१७६३राजापूर१७६९दापोली१७१0८अर्थात या आघाडीतील जागा वाटपावर अजून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. रत्नागिरीत जनजागृती संघाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून, काही अपक्ष उमेदवार या संघाकडून उभे केले आहेत.
रत्नागिरीत १०७ जागांसाठी ४७३ उमेदवार
By admin | Published: October 31, 2016 5:26 AM