शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
3
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
4
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
5
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
6
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
7
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
8
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
9
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
11
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
12
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
13
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
14
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
15
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
16
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
17
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
18
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
19
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
20
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर

अवघ्या पाच महिन्यांत क्रॅक केली चौथी पोस्ट! हॅट्ट्रिक झाली, आता नम्रताचा चौकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 7:43 AM

MPSC News: नम्रता दत्तात्रय पौळ या अवघ्या २४ वर्षे वयाच्या मुलीने स्पर्धा परीक्षा देत एकाच महिन्यात दोन पोस्ट ‘क्रॅक’ केल्याचे कौतुक होत असतानाच सलग दुसऱ्या महिन्यात लोकसेवा आयोगाची तिसरी पोस्ट काढली होती. आता तर तिच्या नावे आणखी एक ‘रेकॉर्ड’ झाले आहे.

- बालाजी अडसूळकळंब (जि. धाराशिव)  - नम्रता दत्तात्रय पौळ या अवघ्या २४ वर्षे वयाच्या मुलीने स्पर्धा परीक्षा देत एकाच महिन्यात दोन पोस्ट ‘क्रॅक’ केल्याचे कौतुक होत असतानाच सलग दुसऱ्या महिन्यात लोकसेवा आयोगाची तिसरी पोस्ट काढली होती. आता तर तिच्या नावे आणखी एक ‘रेकॉर्ड’ झाले असून, लोकसेवा आयोगाच्या ‘सब रजिस्ट्रार’ पदाला गवसणी घालत अवघ्या पाचव्या महिन्यात यशाचा चौकार तिने लगावला आहे. 

नम्रता पौळ ही मूळ राहणार वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील असली तरी तिचा हल्ली मुक्काम कळंब तालुक्यातील आंदोरा येथे आहे. जिद्दी व कष्टाळू या मुलीच्या ‘बायो’त सर्वात दखलपात्र काय तर अवघ्या पाच महिन्यांत ४ स्पर्धा परीक्षेत ‘पोस्ट क्रॅक’ करत मिळविलेले यश. नम्रताचे मार्गदर्शक व समर्थ फाउंडेशनचे प्रमुख प्रा. बनेश्वर शिंदे सांगतात की, नम्रता ही स्पर्धेच्या काळात करिअरच्या मार्गावरील इतर विद्यार्थ्यांसाठी एक ‘आयडॉल’ आहे. ध्येयनिष्ठ, त्याच्या पूर्ततेसाठी सातत्यपूर्ण अभ्यास हे तिच्या यशाचे गमक आहे. 

मी बीएस्सी तृतीय वर्षाला असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी रिव्हिजन आणि प्रश्नपत्रिका सोडविणे, अभ्यासाचे नियोजन आणि सातत्य या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. - नम्रता पौळ 

खेड्यात राहूनही यशाला गवसणी - लहानपणीच माता-पित्यांचे छत्र हरवलेल्या नम्रता हिचा सांभाळ करत आंदोरा येथील आजी चंद्रभागा तांबारे व मावशी छाया अशोक पाटील यांनी मायेचा पदर पुढे केला. - याच बळावर आपल्या दोन भावंडांसह नम्रता खंबीरपणे स्पर्धेला तोंड देत स्वयंसिद्धा ठरली आहे. बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केलेल्या अतिशय ‘नम्र’ अशा नम्रताने पुणे, मुंबई न गाठता आंदोरा या खेड्यात वास्तव्य करत स्पर्धा परीक्षेत हे यश मिळवले आहे. तिच्या यशाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्रOsmanabadउस्मानाबाद