- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यासह मुंबई शहर-उपनगरातही स्वाइन फ्लूचा विळखा वाढतो आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जुलैच्या पंधरवड्यात मुंबईत एकूण २५० रुग्ण आढळले असून, त्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. स्वाइन फ्लूच्या वाढता धोका लक्षात घेता, मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.गेल्या १५ दिवसांत पालिकेच्या रुग्णालयांमध्ये १२५ रुग्णांना डेंग्यूसदृश्य आजार झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मानखुर्द विभागात एक कॉलराचा रुग्णही आढळला आहे. या महिन्यात लेप्टोने दोघांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी २०१६ मध्ये मुंबईत जुलै महिन्यात स्वाइनचा केवळ एक रुग्ण आढळला होता, तसेच एकाही मृत्यूची नोंद नव्हती. मात्र, यंदा जानेवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.१ ते १५ जुलै दरम्यान वांद्रे येथील ५७ वर्षीय पुरुषाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला, तसेच बोरीवली येथील ४१ वर्षीय महिलेचा, गोरेगाव येथील ४५ वर्षीय महिलेचा, परळ येथील ६५ वर्षीय वृद्धेचा आाणि मानखुर्द येथील चार वर्षीय चिमुरड्याचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. स्वाइन फ्लूचे उशिरा झालेले निदान त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. - स्वाइन फ्लूच्या या मृत्यूनंतर वांद्रे, बोरीवली, गोरेगाव, परळ, मानखुर्द परिसरात २ हजार २३० घरांत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात १८ रुग्णांना स्वाइनसदृश्य ताप असल्याचे दिसून आले, त्यांवर उपचार करण्यात आले आहेत. आजारजुलै २०१६ जुलै २०१७रुग्णमृत्यूरुग्ण मृत्यूडेंग्यू६३०२८०लेप्टो७६३२३२मलेरिया५८३१३०९०गेस्ट्रो१,६७२०५४४०कावीळ१३५०८८०स्वाइन१०२५०५कॉलरा७०१०