ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १८ - नाशिकमधील महामार्गांवर अपघातांची मालिका सुरुच असून सोमवारी पहाटे कोकणगाव फाट्याजवळ टेम्पो व कारच्या अपघातात पाच डॉक्टराचां घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात आणखी एक डॉक्टर जखमी झाले आहेत.
मुंबई आग्रा महामार्गावर कोकणगाव फाट्याजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणा-या टेम्पोने एसयूव्ही गाडीला धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की गाडीतील पाचही डॉक्टरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. डॉ. संजय तिवारी, डॉ. सुरेश पाटील, डॉ. चंद्रशेखर गांगुर्डे, डॉ. कुंदन जाधव व डॉ. शेळके असे या मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. तर डॉ. उमेश भोसले हे या अपघाातात जखमी झाले आहेत. पाचही डॉक्टरांच्या अपघाती मृत्यूने नाशिकमध्ये शोककळा पसरली आहे.